मी अंधश्रद्धा पसरवत नाही. चिकित्सेच्या आधारे जे सत्य सापडते तेच मांडतो! YouTube - https://youtu.be/8nAVcTkqvcU?si=X_9ITZIobfT2LWry
Saturday, 14 October 2017
हस्तरेषा - एक संशोधन
Sunday, 17 September 2017
नवरात्र-महत्वाचा कुलाचार
महिषासुरमर्दिनीचे स्वरूप: देवीचे स्वरूप हे नेहमी महिष म्हणजे रेड्याला मारताना दाखवले गेले आहे. ह्याचा काळाचा शोध घेतला असता आपण फार पूर्वी म्हणजे सुमारे २० ते ५० हजार वर्षे मागे जाऊन पोचतो. मानव शेती करायला लागल्याचा काळ हा सुमारे १०००० ते १५००० वर्षापूर्वीचा आहे. त्यापूर्वी कित्येक हजार वर्षे माणूस हा रानटी अवस्थेत होता. पशुपालन विकसित होत होते. हा काळ फार मोठा म्हणजे सुमारे ३० ते ४० हजार वर्षे चालला. पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात होती. सुमारे ७००० वर्षापूर्वीची पूर्व-सिंधु संस्कृतीतील खालील प्रतीके पाहिल्यावर हे लक्षात येते.
वरील चित्रातील ध्यानस्थ बसलेला पुरुष स्वतः आद्यपुरुष महिष (पृथ्वी पती म्हणजे महि+इष), अर्थात महेश म्हणजे शंकर आहेत. विशेषतः डोक्यावर दर्शविलेली शिंगे म्हणजे माणूस व महिष यातील संबंध दर्शवितात. पुढे माणूस शेती करत स्थिरावत होता तसे नागरी संस्कृतीची निर्मिती करावी लागली. रानटी अवस्थेत जशी पुरुषाची शक्ती महत्वाची असते तशी नागरी संघटीत समाजात स्त्रीची शक्ती व तिचे अधिकार महत्वाचे बनतात. इथे स्थिरता, निर्मिती ह्यांना महत्व आहे. स्त्रियाच शेतात पेरणी करीत असत असे संशोधक सांगतात. गाव निर्माण झाले तसे ग्रामदेव व ग्रामदेवी ह्या अस्तित्वात आल्या.
रानटी अवस्थेतील पुरुषाला (अर्थात महीषाला) सुसंस्कृत नागरी/शेती करणाऱ्या समाजात सामावून घेताना बराच संघर्ष झाला. ते कार्य आपली आद्य स्त्री म्हणजे कुलस्वामिनी पार पाडले हे वरील चित्रात दर्शविले आहे. आज नामशेष झालेला रेडा हा प्राणी पूर्वी समस्त भूमी व्यापून राहिलेला होता. त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी मानवाला मोठा उद्योग करावा लागला आहे. हा रेडा हटवूनच पुढे शेतीचा मार्ग प्रशस्त झाला होता. नक्कीच काहीतरी मोठी उलथापालथ ह्या रेडा प्रकरणात झालेली आहे. नवमीला दिला जाणारा पशुबळी याचेही इथे काहीतरी तारतम्य आहे. पुढे तो बळी प्रतीकात्मक म्हणजे इतर प्राणी जसे बोकड इत्यादींचा द्यायला सुरुवात झाली. आता पशुबळी प्रथा गरज नसल्याने बंद होत आहे.
तर अशाप्रकारे आपण देवीच्या आद्य स्वरूपाचा विचार केला. आता आपण नवरात्र ह्या कुलाचाराचा अभ्यास करू,
घटस्थापना: "पेरले तर उगवते" अशी म्हण प्रसिद्ध आहे. आद्य समाजात प्रत्येकाची थोडीफार शेती होतीच. ह्या शेती उद्योगाचे स्मरण करून देणारा जो कुलाचार आहे तो म्हणजे घटस्थापना. हे व्रत नाही हा कुलाचार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शास्त्रात केलेले आहे. आपण जे अन्न बनवतो ते अन्न ज्या शक्तीने निर्माण होते तिच्या पूजनाचा हा विधी आहे. हा विधी साधा सरळ असून आपण स्वतः सहज करू शकतो.
१) सर्व देव स्वच्छ धुवून नागिणीच्या पानावर ठेवले जातात. पानांचा देठ देवाकडे असतो. देवांना हळद-कुंकू, अक्षता अर्पण करून धूप, दीप दर्शवून अत्तर लावावे. दीप, घंटा इत्यादींचे पूजन करावे.
२) देवघरात सर्व देवांच्या समोर एक पाण्याचे चौकोन मंडळ काढून त्यावर थोड्या अक्षता टाकाव्यात. तिथे एका पत्रावळीवर वावरी (म्हणजे शेतातील काळी किंवा तपकिरी माती) सुमारे पाच बोटे खोल अंथरून त्यावर एक मातीचे मडके (सुगडी) सरळ राहील असे मातीत दाबून ठेवावे. हे मडके सच्छिद्र असावे. ते पाण्याने पूर्ण भरून त्यात तांदूळ टाकावेत. त्यावर ५ नागिणीची किंवा आंब्याची पाने लावून शेंडी वरच्या दिशेला करून नारळ ठेवावा. ह्या नारळ व घटाचे हळद-कुंकू, अक्षता अर्पण करून, धूप, दीप दर्शवून पूजन करावे. काही ठिकाणी वरील नारळाला वस्त्र घालण्याची पद्धत असते. हे वस्त्र लाल रंगाचे असावे. आपल्याला माहित नसेल तर कापसाला थोडे हळद-कुंकू लावून ते वस्त्र अर्पण करावे. जे सौभाग्यअलंकार पूजा साहित्याबरोबर मिळतात ते घटाच्या (सुगडीच्या) गळ्याजवळ घालावेत. ते नसतील तर विविधरंगी नाडा असतो तो बांधावा. तोही अलंकार स्वरूपच असतो.
त्यानंतर जी सप्तधान्य मिळतात ती आजूबाजूच्या मातीत बोटभर माती बाजूला काढून धान्य पसरल्यावर त्यावर ती माती टाकावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे. यात प्रामुख्याने गहू तांदूळ, ज्वारी, बाजरी, जव, डाळी हे धान्य असते.
३) पहिली माळ ही नागिणीच्या पानांची किंवा फुलांची असते. अशा नऊ माळा नऊ दिवस घटाच्यावर खिळ्याला टांगून खाली घटावर येतील अशा प्रकारे सोडाव्यात. प्रत्येक दिवशी एक माळा अर्पण करीत जावे. माळेतील फुले/पाने संख्येने विषम असावीत. बरेच घरात ७ व्या माळेला कडाकणी व वेणी फणी अर्पण केली जाते. तीही नैवेद्य करून देवघरात वर खिळ्याला टांगून ठेवली जाते. रोज कपूर जाळून देवीची आरती करावी.
हि सर्व पूजा व घटस्थापना सकाळी १० च्या आत संपन्न झालेली उत्तम.
नित्यविधी: एकदा घटस्थापना झाली असता देव हलवू नयेत. रोज एक फुलांची माळ अर्पण करीत जावे. रोज पेरलेल्या धान्यावर थोडे पाणी शिंपडावे.
बरेच घरात एक व्यक्ती नवरात्रात उपवास करते. फळभाज्या (लाल भोपळा, काकडी इत्यादी) सुद्धा उपवासाला चालतात. इतर नेहमीचे उपवासाचे पदार्थ चालतात.
उपवास हा पहिल्या माळेला सुरु होतो व नवव्या माळेला त्याचा पारणा म्हणजे तो सोडला जातो. उठता-बसता केलेला उपवास हा फक्त पहिल्या व नवव्या माळेला केला जातो. म्हणजे सकाळी धरलेला उपवास रात्री सोडता येतो. काही लोक नऊ दिवस पायात पादत्राणे घालत नाहीत. पण तसा नवस असेल तरच ते करणे ठीक आहे.पादत्राणांचा नियम किवा कुलाचार नाही त्याऐवजी उपवास केलेला चालतो.
नवरात्र पूजाविधी स्त्री व पुरुष असे दोघांनी करायचा असतो. नवरात्राचा क्षय करून चालत नाही. कडाकणी व वेणी फणी सातव्या माळेला करता अली नाहीत तर नवव्या माळेला करावीत. बरेच लोक गावाची सीमा न ओलांडण्याचा उपक्रम करतात. उद्देश हाच आहे कि गावाबाहेर गेल्याने नवरात्रातील ९ दिवस देवीची सेवा करण्यात व्यत्यय येऊ नये.
नंदादीप/समई: समई व वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हा पूर्वीच्या जीवनाचा अविभाज्य भाग होते हे विसरून चालणार नाही. नवरात्रात नंदादीप अखंड प्रज्वलित ठेवावा असा कुलाचार आहे. त्यासाठी काही काळजी घेणे महत्वाचे आहे. बरेचदा तेल संपल्याने किंवा काजळी जमा झाल्याने नंदादीप विझतो. त्यासाठी रोज सकाळी व संध्याकाळी नंदादीपात (समईत) पुरेसे तेल आहे का हे तपासत जावे. सहसा २ किंवा ३ वाती असाव्यात. एकएक करून त्यांची काजळी लहान काडीने साफ करावी. वाती फार जाड नसाव्यात पण साधारण ६ इंच लांब असाव्यात म्हणजे ९ दिवसात वात बदलावी लागत नाही. असे केल्याने नंदादीप सदैव तेवत राहतो. चुकून एखादी वात काजळी काढताना विझली तरी दोष लागत नाही.
घट उठवणे: हा विधी नवमी म्हणजे नवव्या माळेला सकाळी केला जातो. १, ३ किंवा ५ पुरुष व स्त्रिया यांनी तळी भरायची असते. पुरुषांबरोबर स्त्रियाही तळी भरू शकतात. दिवटी असल्यास ती पेटवली जाते. एका ताटात हळद-कुंकू, कोरडे खोबरे, सुपारी व पाने घेतली जातात. डोक्यावर टोपी घालून सर्वजण गोलाकार बसतात. आई-राजा उदे उदे म्हणून तळी उचलतात. पानसुपारी ताटाखाली ठेऊन बाकीची प्रत्येकाला दिली जाते व हळद-कुंकू प्रत्येकाच्या कपाळाला लावले जाते. तसेच ते ताट हातात घेऊन एकाने घटाला स्पर्श करून व त्याच्या हाताला सर्वांनी स्पर्श करून उदो-उदो (म्हणजे उठ-उठ) म्हणून घट हलवला जातो.
आता परत तळी भरण्याच्या जागी येऊन कडाकणी ताटात घेऊन पुन्हा एकदा तळी भरली जाते. खोबरे व कडाकणी सर्वांना वाटली जातात. दशमीला घट त्यावर उगवलेले धान्य झाकून ठेवले जाते. बरेच जण नवमीला कुमारिका पूजन करतात. देवी कुमारिका स्वरुपात प्रकट झाल्याची कथा असल्याने कुमारिकेचे पाय धुवून तिला भोजन व भेटवस्तू दिली जाते.
दसरा/ विजयादशमी: नवरात्र उत्सवाची सांगता दसऱ्याने होते. सीमोल्लंघन, शस्त्रपूजन, औजारांची पूजा केली जाते. गावाची वेस ओलांडून शमीच्या वृक्षाचे दर्शन घेतले जाते. नंतर गावात भैरवनाथ व मारोतीचे दर्शन घेण्याचा रिवाज आहे. सीमोल्लंघन करून घरी आल्यावर औक्षण केले जाते. नंतर तांदुळाचा महिषासुर बनवून त्याला कापण्याची प्रथा आहे. आपट्याची पाने एकमेकांना देऊन सोने लुटले जाते.
असा एकूण आपला हा नवरात्र व महत्वाचा कुलाचार आहे. वेळोवेळी त्यात बदल होत गेलेला असणार हे नक्की. तरी मूळ विधी हा शेती व सृजन या तत्वाशी जोडला गेलेला आहे. काही व्यावहारिक तत्वांची धर्माशी सांगड घालताना अनेक कथा निर्माण झाल्या त्याचे स्वरूप जाणून घेणे आज अपरिहार्य आहे.
Saturday, 26 August 2017
देवघरातील मूर्ती.
मित्रांनो सांगण्यास आनंद होत आहे की मी युट्युबवर व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्याशी हितगुज करण्यास येत आहे माझे 3 व्हिडीओ प्रदर्शित झाले आहेत त्यांची लिंक इथे देत आहे , बऱ्याच अध्यात्मिक चर्चेसाठी अवश्य भेट द्या . लिंक अड्रेस बार मध्ये पेस्ट करावी
https://youtu.be/cPJqxj9XpcM?feature=shared
गणपती बाप्पा मोरया
जय शिवाजी जय भवानी
देवघरात टाक पुजण्याचे प्रयोजन: विवाहात नवीन देव करण्याची प्रथा आहे. तसेच मृत्यू इत्यादींचे अशौच आले तर देव नवीन केले जातात. बरेचदा घासून देवांची झीज होते. त्यातील डोळे अलंकार इत्यादी बारकावे नष्ट होतात. कधीकधी तो देव नक्की कुठला आहे इतका संभ्रम निर्माण होतो. देव सदैव सुचीर्भूत असावेत. त्यांचे नित्य कुलधर्म कुलाचार केले गेल्याने ते जागृत राहतात व तत्काळ फलदायी बनतात. झीज झालेले तसेच मृतअशौच आलेले देव हे निष्प्रभ असतात. साधारणतः घरात मृत्यू, विवाह सारखेसारखे होत नाहीत व मधल्या काळात देवांची झीज होते. जेव्हा विवाह मृत्यू इत्यादी होतात तेव्हा दरवेळी आर्थिक स्थिती चांगलीच असते असे नाही. अशावेळी जर बदलायचे झाले तर टाक कमी खर्चात बदलून होतात. तेच जर मोठी मूर्ती असेल तर काम खर्चिक होते. मूर्तीतील बारकावे जसेच्या तसे निर्माण करता येत नाहीत. गणपतीचा मारुती होण्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक टाकांची पूजा करतात.
गणपती हा प्रभावी देव आहे. नवसाला पावणारा म्हणून विघ्नहर्ता असे याचे नाव आहे. सर्व तत्वज्ञ गणेशाला आपल्या बाजूला ओढायचा प्रयत्न करीत असतात. उदाहरणार्थ अथर्वशीर्षातील खालील श्लोक पहा.
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि |
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं | रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं |
वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं | ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् || ६ ||
अर्थ: तूच ब्रम्हा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र आहेस. भू, भुवः, स्वः, हे तिन्ही लोक तुझ्यात सामावलेले आहेत.
हे अतिशयोक्तीपूर्ण किवा स्तुतीपर स्तोत्र आहे त्याचा शब्दशः अर्थ घेतला तर गणपती म्हणजेच ब्रम्हा किवा विष्णू किवा रुद्र आहे का असा गोंधळ उडतो. पुढे इंद्र, अग्नी वायू हाही घोळ होतो. पण शब्दशः अर्थ घेणे चुकीचे आहे. कारण ब्रम्हा, विष्णू, रुद्र, इंद्र, वायू, अग्नी इत्यादी देवता पूर्णतः वेगळा गुणधर्म असलेल्या आहेत. इथे फक्त पराकोटीची स्तुती केल्याने सर्व देव व शक्ती म्हणजेच गणपती आहेत असे म्हटले आहे. हे बर्याचश्या मंत्रात आढळते. त्यामुळे देवाचे नक्की मूळ व पूजेचा उद्देश काय यात मात्र आपला गोंधळ उडतो.
दुसरीकडे काही तत्वज्ञ गणेशाला सिंधू संस्कृतीतील देव मानतात. भाजलेल्या मातीचा २ इंच x २ इंच आकाराचा मुखवटा लोक तोंडाला लाऊन नृत्यादी करीत असा दावा करीत असतात. पण २ इंच हा आकार फारच लहान आहे. हा गणपती कि हत्ती हेही स्पष्ट होऊ शकत नाही.
अन्नपूर्णा: वास्तविक ग्रामदेवता व लक्ष्मी ह्या धनधान्य व प्रदान करणाऱ्या देवी आहेत, त्यांच्याबरोबर बरेच घरात अन्नपूर्णा देवी आलेली आहे. अन्नपूर्णा देवीचा टाक असतो तसेच धातूची मूर्तीसुद्धा असते.
सांस्कृतिक देवाणघेवाणीत तसेच राजकीय बदल होत असताना संपूर्ण समाज एकाच देवीदेवतेचे पूजन करीत असेल तर त्यांना एकत्र आणणे सोपे असते. त्यामुळे विविध देव पुढे आपल्याकडे येत गेले. श्रद्धा एकटावल्या गेल्या तसेच विभाजित झाल्या. हे आणखी कोणते देव होते यांची आपण पुढे माहिती घेऊ.
Thursday, 17 August 2017
आपल्या देवघरातील देव
८) अष्टभुजा सिन्हावरची.
९) यल्लम्मा- दहा हात व डोक्यामागे चक्र.
१०) जोखाई- जानाई सारखीच फक्त कणीस व मुल बरोबर नसते.
११) लक्ष्मी - मागे दोन हत्ती सोंडेने हार घालताना.
१२) ज्योतिबा- घोड्यावर स्वार, समोरून व हातात तलवार.
१३) नवनाथ- ९ देव.
१४) मुंजोबा- उभा उग्र पुरुष व एका हातात अग्नी.
१५) भैरोबा - घोड्यावर एकटा व हातात तलवार.
१६) अष्टभुजा वाघावारची वाघजाई.
१७) वीर- धनुष्य-बाणधारी
१८) गणपती.
१९) शिव पार्वती.
२०) वणी सप्तशृंगी १८ हात असलेली.
२१) औंधची देवी.
२२) घोड्यावरची देवी.
२३) कोल्हापूरची महालक्ष्मी
२४) माता-पिता
२५) साती आसरा- सात देवी व मगर किवा पशु.
वरील टाकांचे फोटो हवे असल्यास मला फेसबुकवर इनबॉक्समध्ये संपर्क करा.
मित्रांनो सांगण्यास आनंद होत आहे की मी युट्युबवर व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्याशी हितगुज करण्यास येत आहे माझे 3 व्हिडीओ प्रदर्शित झाले आहेत त्यांची लिंक इथे देत आहे , बऱ्याच अध्यात्मिक चर्चेसाठी अवश्य भेट द्या . लिंक अड्रेस बार मध्ये पेस्ट करावी
https://youtu.be/cPJqxj9XpcM?feature=shared
गणपती बाप्पा मोरया
जय शिवाजी जय भवानी
Monday, 14 August 2017
जात व आडनावे..... पुढे चालू
ती जात होती लढवैय्ये. हे लढवैय्ये लोक सर्व समाजातून पुढे आले. पूर्वीचे ४ वर्ण म्हणजेच ब्राम्हण क्षत्रिय वैश्य व शुद्र हे केव्हाच नष्ट झालेले होते. कारण त्यांची कधी गरजच पडली नव्हती. चतुर्वर्ण पद्धतीत जे चार वर्ण होते ते कधीच इतिहासजमा झाले होते. राहिले होते ते फक्त शेतकरी, पशुपालक आणि कारागीर! आता ह्याच समाजातून लढवैय्ये पुढे आणायचे होते. तेही मोठ्या संख्येने कारण समोर जो शत्रू उभा होता त्याच्यात जात नव्हती.
समाज अशाप्रकारे स्वतःमध्ये बदल घडवून आणत होता. साहजिकच उत्तरेकडील प्रदेशात हा बदल आधी घडला. यादव आडनाव असलेले एक गाव असेल तर त्यात ७० ते ८० टक्के यादव लढवैय्ये बनले. शिल्लक राहिलेले २० ते ३० टक्के हे शेतकरी, कारागीर बनले. लढवय्या लोकांना अनेक मुभा समाजाने स्वतःहून दिल्या. शेतीच्या जमिनी कसायला इतर लोकांकडे असल्या तरी वंशपरंपरागत मालकी लढवैय्या माणसाची होती. संख्या वाढवण्यासाठी बहुपत्नीत्व, दासी अशा मुभा मिळाल्या. यापूर्वी एकपत्नी राम हा समाजाचा आदर्श होता हेही इथे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
इतिहासाच्या गदारोळात हा मध्यकालीन समाजव्यवस्था व इतिहास कायम गोंधळ निर्माण करीत राहतो. त्याचे नेमके स्वरूप काय होते हे तपासणे गरजेचे आहे.
एक साधा विचार करा कि आज विज्ञान प्रचंड प्रगती करीत आहे, बऱ्याच अवघड बाबी आज विज्ञानाने साध्य करून दाखवल्या आहेत ज्या एकेकाळी अशक्य वाटत होत्या. त्यामुळे माणूस पूर्वी ज्या देवाला सर्वशक्तिमान समजून शरण जात होता तो आज विज्ञानाला शरण जात आहे. माणूस असा विचित्र प्राणी आहे कि स्वतःचा स्वार्थ असल्याखेरीज कशाला किती महत्व द्यायचे हे नेहमी ठरवत असतो. जेव्हा युद्धे अजिबात होत नव्हती तेव्हा आपल्या समाजाला चार वर्ण व त्यांच्या महत्तीची अजिबात गरज वाटली नाही. शांततेच्या काळात हे चार वर्ण नष्ट झाले. जेव्हा परकीय आक्रमणांच्या काळात लढणाऱ्या समाजाची गरज निर्माण झाली तेव्हा लढवैय्या जाती निर्माण झाल्या. त्यांनी मग आम्ही पूर्वीचे क्षत्रिय कुलीन आहोत इत्यादी मिथकांचा आधार घेतला. पण त्यात तथ्य नाही.
दुसरा मुद्दा हा कि जेव्हा वर्णव्यवस्था होती तेव्हा चार वर्ण मानणारे यांची संख्या किती होती? तर भारतातील जैन, बुद्ध, शैव, शाक्त, वैदिक व इतर अनेक पंथांचा विचार केला तर फक्त वैदिक यज्ञ करणारे लोक चार वर्ण मानीत होते. म्हणजे हि संख्या फारच क्षुल्लक होती. त्यातही प्रत्यक्ष कृती व युद्धे करणारे क्षत्रिय फक्त एक चथुर्ताश! शत्रूच्या सैन्यासमोर ही क्षत्रियांची संख्या अगदीच तोडकी होती याबद्दल दुमत असायचे कारण नाही. जेव्हा लुटालुटीचे अनेक फटके बसले व समाजात लुटीला विरोध करायची मानसिकता निर्माण झाली त्यावेळी वैदिक तत्वज्ञानाची नव्याने जाहिरात सुरु केली गेली. पुढे वर्ण व्यवस्थेतून जातीव्यवस्था निर्माण झाली हा भ्रम पसरला.
आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळू. जेव्हा आपण मी कोण आहे, माझे पूर्वज कोण? माझे दैवत कोणते? या बाबींचा शोध घेतो तेव्हा वरील सर्व मुद्दे ध्यानात घेणे गरजेचे आहे. एकाच आडनावाचे कुळ हे एकच असू शकते. त्यांचे मूळ गावही एकच असू शकते. एकच गाव व आडनाव असेल तर दैवत एकच असण्याची शक्यता फार जास्त असते.
बऱ्याच अडनावांचा कुलवृत्तांत लिखित स्वरुपात आढळतो. ज्या ज्या पिढ्यात आर्थिक स्थिती सत्ता हातात होती तेव्हा ह्या आडनावाच्या लोकांनी अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले. हिंदूंना देवांची कमी नाही. देवदेव करायला गेले तर एक जन्म अपुरा आहे. जागोजागी अनेक मंदिरे व त्यांचे अवशेष आज आढळतात. त्यांचा इतिहास हा काळाच्या अंधारात गायब झाला आहे. तर बरेच ठिकाणी त्यावर पुराणकथांचे थर जमा झाले आहेत. त्यात राम सीता, शिव-पार्वती ह्यांच्या एकसारख्या स्वरूपाच्या कथा बरेच ठिकाणी आढळतात. खंडोबा, शंकर, ग्रामदैवत भैरोबा, ग्रामदेवी किवा मातृदेवी जोगेश्वरी (जानाई), देवीची विविध रूपे, म्हसोबा, आषाढात पुजली जाणारी लक्ष्मी, जलदेवता असे अनेक देव ह्या मधल्या काळात आपल्या देवघरात दाखल झाले. देव पंचायतन म्हणजे सूर्य, देवी, शिव, विष्णू, आणि गणपती यांना मानणारा एक पंथ आहे.
ह्या देवांचे कोडे उलगडण्यास आपल्याला आपला अंधारात दडलेला इतिहास तर्काच्या आधारावर घासून पहिला पाहिजे.त्यावर पुढील काही लेखात आपण चर्चा करू.
समाप्त.
Friday, 11 August 2017
जात व आडनावे
मित्रांनो सांगण्यास आनंद होत आहे की मी युट्युबवर व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्याशी हितगुज करण्यास येत आहे माझे 3 व्हिडीओ प्रदर्शित झाले आहेत त्यांची लिंक इथे देत आहे , बऱ्याच अध्यात्मिक चर्चेसाठी अवश्य भेट द्या . लिंक अड्रेस बार मध्ये पेस्ट करावी
https://youtu.be/cPJqxj9XpcM?feature=shared
गणपती बाप्पा मोरया
जय शिवाजी जय भवानी
क्रमश:
मित्रांनो सांगण्यास आनंद होत आहे की मी युट्युबवर व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्याशी हितगुज करण्यास येत आहे माझे 3 व्हिडीओ प्रदर्शित झाले आहेत त्यांची लिंक इथे देत आहे , बऱ्याच अध्यात्मिक चर्चेसाठी अवश्य भेट द्या . लिंक अड्रेस बार मध्ये पेस्ट करावी
https://youtu.be/cPJqxj9XpcM?feature=shared
गणपती बाप्पा मोरया
जय शिवाजी जय भवानी





















