Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Monday, 21 September 2015

सिंहस्थ (कुंभमेळा) आणि दुष्काळ

मोदी सरकार आले आणि नेमका सिंहस्थ कुंभमेळाही आलाय. पण सरकारची डोकेदुखी वेगळ्या कारणाने वाढली आहे. ते कारण म्हणजे पावसाअभावी पडलेला दुष्काळ. त्यामुळे हा सिंहस्थ कुंभमेळा काय प्रकार आहे जाणून घेण्याची आपली सर्वांचीच उत्कंठा ताणली गेली आहे. तो काही योगायोगाचा भाग आहे का म्हणून सध्याच्या सरकारच्या नशिबी आला ? हेही आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. 
कुंभमेळा आणि आकाशिय ग्रहांचा संबंध आहे हे बहुतेकांना माहित आहे. जेव्हा गुरु हा ग्रह सिंह राशीला येतो तेव्हा कुंभमेळा साजरा होतो हे सर्वाना माहित आहे. म्हणून त्यासाठी आपण आधी गुरु आणि सिंह राशीची माहिती करून घेऊ. गुरु हा पृथ्वीच्या जवळचा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. भौतिकशास्त्रीय दृष्ट्या आपल्या गुरुत्वाच्या शक्तीने सुर्यमालेला स्थिरता देण्याचे काम गुरूच करतो हे शास्त्राज्ञानी आधीच सिद्ध केले आहे. गुरुचे महत्व ज्योतिष्यशास्त्रातही तितकेच आहे. गुरु हा फार महत्वाचा शुभग्रह मानला गेला आहे. विपुलता, धष्ट-पुष्टता, शुभत्व, नैतिकता, भरभराट, वृद्धी, संचय ह्यांचा कारक गुरु हा आहे.
सिंहस्ठ काळात हा गुरु नेमका सिंह राशीला येतो. सिंह रास हि रवीची स्वतःची रास आहे. तसेच ती अग्नितत्वाची रास आहे. मेष, सिंह आणि धनु ह्या अग्नितत्वाच्या राशी आहेत. पण त्यातले त्यात सिंह हि रवीची असल्याने आधीपासूनच जास्त प्रभावी मानली गेली आहे. शिवाय रवि आपल्या सौरमालेचा राजा, असे असूनही हा एक पापग्रह समजला गेला आहे. त्याला उग्रता, राजकीय कठोरता, उष्णता, शुष्कता, ओसाडपणा, अध्यात्म आणि पर्यायाने येणारे वैराग्य ह्यांचा कारक समजले जाते. 
आता थोडक्यात पहा, जेव्हा गुरु हा पिककपाण्याचा व भरभराटीचा कारक असलेला ग्रह जेव्हा सूर्याच्या उग्र राशीला जातो तेव्हा काय होणार? पाउस कमी, उष्णता वाढणार. म्हणजेच थोडक्यात दुष्काळ. 
म्हणजे सिंहस्ठ हा काळ दुष्काळासाठी समजला जाणारा काळ होता व आहे. १७७०, १८७६-१८७७, १९७२ चा मोठा दुष्काळ असताना गुरु धनु राशीला होता, १८९७ ते १८९९ चा दुष्काळ असताना गुरु सिंह राशीला होता. दुष्काळ हा आपल्या पाचवीला पुजला आहे आणि होता. पण त्यावर संशोधन करून काहीतरी तारतम्य काढायचे काम गेल्या १०० वर्षांत कोणीही केले नाही. आता मोदी सरकारची ह्या दुष्काळाने मोठी गोची होणार आहे.
आता आपले पूर्वापार साजरे होत आलेले सण कसे ऋतूचक्राप्रमाणे साजरे केले जात हे थोडे पाहू! लग्नसराई फेब्रुवारी ते जूनचा पाऊस सुरु होईपर्यंत आणि मग परत नोव्हेंबरला तुळशीच्या लग्नानंतर अशी नियोजित केलेली आहे. मोठे सण नवरात्रापासून सुरु होतात ते दिवाळीपर्यंत, म्हणजे नेमके शेतीची कामे संपलेली असतात. शेतकरी जरा निवांत झालेला असतो अश्या वेळी. बलिप्रतिपदा तर सर्वांना माहीतच आहे. यमद्वितीया म्हणजे भाऊबीज हा पुराणातील चांद्रसेनीय कायस्थ लोकांचा सण आहे. चित्रगुप्ताने यमाला मदत केली आणि त्याच्या कामातून सवड मिळवून दिली म्हणून तो त्याच्या बहिणीला भेटू शकला अशी ही कथा आहे अशा इतर अनेक कथा आहेत. सुर्यषष्ठी, रथसप्तमी, शिमगा (होलिका) असे आपले असंख्य प्राचीन सण अश्या प्रकारे ऋतूचक्राप्रमाणे ठरवले गेले होते. गणेश चतुर्थी आणि गणपती हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या साजरा करायला सुरुवात केली. त्यापूर्वी ब्राम्हण लोकांना संकष्टी चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हे व्रत माहित होते. कारण आपण आधीच पहिले कि गणपती हि बुद्धी-सिद्धीची देवता आहे. तिची उपासना करायचे सामान्य बहुजन वर्गाला करायचे काहीही प्रयोजन नव्हते.
अगदी अश्याच प्रकारे सिंहस्थ कुंभमेळा हा ह्या काळात येणाऱ्या अवर्षणाच्या दृष्टीने मुद्दाम धार्मिक कार्यासाठी राखून ठेवलेला होता असे पुढे सहज स्पष्ट होते. शेतकरी मर-मर राबतो. त्याला सुद्धा थोडा बदल हवा असतो. युरोप आणि अमेरिकेत असे बदल घडविण्यासाठी नवीन सण जन्म घेत आहेत. आपल्या शेतीप्रधान संस्कृतीत सुद्धा असे सण आणि उत्सव नुसते एका वर्षापुरते नव्हे तर अनेक शतकांचा विचार करून ठरवले गेले होते, त्यातलाच हा वैदिक आणि अवैदिकांनी स्वीकारलेला सण म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा हा होय.
दुष्काळाची चाहूल व त्यांचा इतिहास जर समजून घेतला तर त्याचा सामना करायचे योग्य नियोजन आपण करू शकू. 

Sunday, 2 August 2015

पुरोगाम्यांचा सूळसूळाट?

पुरोगाम्यांचा सूळसूळाट
 लेखाचा विषय जरा कटू शब्दाने वर्णीत केला आहे पण मुळात पुरोगामी ह्या शब्दाबद्दल काही फार राग नाही, पण कधी कधी असे वाटते कि तथाकथित पुरोगामी लोक आपल्या समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास एका विचित्र अलिप्त टोकावरून करत असतात. त्यांनी आपल्या देशाचा खालीलप्रमाणे अभ्यास, करणे गरजेचे आहे
  • भौगोलिक स्थान,
  • कटू-गोड इतिहास,
  • लोकांच्या उपजीविकेची साधने,
  • इथे जन्मलेले धर्म व विचार
कॉंग्रेसचे विचार पुरोगामी होते असे वाटून भारतीय जनतेने त्यांना ६० वर्ष वंशपरंपरागत सत्ता भोगायला दिली. सुरुवातीला ते पुरोगामी विचार मोठे रोचक वाटत होते, पण नंतर नंतर त्यातला फोलपणा स्पष्ट होत गेला. आणि मे २०१४ ला ऐतिहासिक सत्तापालट होऊन कोन्ग्रेस हा पुरोगामी पक्ष विरोधी नेतेपदाची दावेदारीही सांगू शकला नाही. हजारो वर्षे पुरोगामी विचारांचा लढा देणाऱ्या आपल्या देशाने हा विचार का केला? का नाकारले ह्या पुरोगामी पक्षाला? ह्या लेखात पुरोगामी नावाखाली सध्या काय चालू आहे, काय आहे, ह्याचा उहापोह केला आहे.
  
१) सध्याचे पुरोगामित्व हे भारतीय संस्कृतीच्या ज्ञानाला अधोगामी ठरवत चाललेले पुरोगामित्व आहे. बरेचसे पुरोगामी देशाचे व समाजाचे  वाट्टोळे हे वैदिक ह्यांनीच केले हे पटविण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात.  पुरोगामी विचारतात कि समजा सगळे मुस्लिम भारतातून निघून गेले तर आपले सगळे प्रश्न संपतील का? त्यांना एक प्रश्न विचारायला हवा कि, वैदिक शिल्लकच नाहीत, ते संपुष्टात आल्याने समाज फार बदललाय का? समाजाचे सगळे प्रश्न सुटलेत का? ज्यांनी आत्तापर्यंत ज्ञान आपल्या ताब्यात ठेवले ते ते तथाकथित वैदिक तर परदेशात पळून गेलेत. थोडेफार राहिलेत तेही पळून जायच्या मार्गावर आहेत. मग उच्चवर्णीय राहतात कोण? तर राहतात क्षत्रिय, (म्हणजे मराठे) त्यांना फक्त लढायला लावले गेले. लढायला लावणारे जसे वैदिक होते तसेच वैश्य व शुद्रही होते, कारण लढणे हि सामाजिक जबाबदारी होती. शुद्र आणि वैश्य आम्ही लढायला जबाबदार नाही असे म्हणून हात काढून घेते झाले नसतील हे हे सत्य असू शकते. 

दहशतवादाचे उद्दातीकरण
इतिहासाचे दाखले देताना पुरोगामी नेहमी वेद, त्यातील हिंसा, वैदिक वान्ग्मायाचा भंपकपणा ह्यावर हिरहिरीने लिहितात पण पण इतर धर्मातील हिंसा व त्यातील दाखले ह्याबद्दल नेहमीच आदराने बोलतात. त्यांच्या ह्या लूटमारीत किती पुरुष मेले, किती बायकानची अब्रू लुटली गेली, किती गुलाम देशातून बंदी बनवून नेले गेले ह्याचा आकडा हे पुरोगामी शोधत नाहीत. 
पुरोगामी संकल्पना
पुरोगमी म्हणजे आपल्या जुनाट संस्कृतीला नावे ठेवणे असे झाले आहे. त्यापेक्षा आपले पूर्वज कशा प्रतिकूल परिस्थितीत राहत होते. प्रतिकूल जीवन असताना त्यांनी अनेक महत्वपूर्ण संकल्पना जन्माला घातल्या. ह्यांचा पूर्ण अभ्यास न करता विचार करणे म्हणजे पुरोगामी असे पुरोगामित्वाचे स्वरूप झालेले आहे. त्यामुळे पुरोगामी आणि प्रतिगामी ह्यातील सीमारेषा आपली चिकित्सावृत्ती आणि प्रतिगामी लोकांचे जीवन जाणून घेण्यावरून अवलंबून आहे. आत्ता आपण एक रात्र वीजपुरवठा बंद झाल्यास नुसते उकाड्याने अस्वस्थ होण्याशिवाय अनेक प्रश्नांना आपण तोंड देतो. आत्ताची पिढी रात्री भटकण्याला पुरोगामी समजते. पण हे इतिहासात किती अवघड होते? आत्ताही काहींना ते सोपे असले तरी काही अपवाद वगळता सर्वांना ते चमत्कारिक वाटते!