Showing posts with label हिंदू जातीसंस्था. Show all posts
Showing posts with label हिंदू जातीसंस्था. Show all posts

Friday, 11 September 2015

देवास अथवा देवीस नैवेद्य कसा दाखवावा

देवीस नैवेद्य कसा दाखवावा
तुळजा भवानीस तीन प्रकारचे नैवेद्य वर्षभर दाखवतात.
गोड नैवेद्य: यात पुरणपोळी, गुळवणी, तिखट आमटी, पालेभाजी, कुरडई, पापडी, भजी, वरण भात व त्यावर तूप इत्यादी यांचा समावेश असतो. 
दही भात नैवेद्य: यात दही व भात यांचा समवेश असतो. 
तिखट नैवेद्य: यात ज्याला बोल्हाई आहे त्यांनी बोल्हाईचे (म्हणजे मेंढीचे) आणि ज्यांना बोल्हाई नाही त्यांनी बोकडाचे मटण व त्याचा रस्सा, कोरडे परतलेले मटण, चपाती किवा भाकरी, कलेजी (शक्य असल्यास) भात, लिंबू, मीठ व कांदा असे पदार्थ येतात. 
हे तिन्ही नैवेद्य विनाखंड देवीस दाखवले जातात. 
विधी: शुद्ध पाणी घेऊन त्याने प्रत्येक नैवेद्याचे ताट देवीसमोर ठेवण्यापूर्वी एक मंडल (चौकोन) काढावा व त्यावर ताट ठेवावे. तेच पाणी घेऊन ताटाभोवती १ किवा ३ वेळा फिरवावे. नंतर ताटातील प्रत्येक पदार्थाचा लहान तुकडा (सगळे तुकडे हातात मावतील अशाप्रकारे) किवा एक एक घेऊन प्रथम देवीच्या मुखास लावावेत, मग उजव्या आणि डाव्या खांद्यास, मग पायास लावावेत. देवीस नमस्कार करावा. हे तुकडे स्वतः खावेत, कीटाकांस, गाईस द्यावेत किवा पायदळी जाणार नाहीत अश्या ठिकाणी ठेवावेत. राहिलेला नैवेद्य प्रसाद म्हणून खावा. फेकून देऊ नये.
घरात नैवेद्य दाखवताना हाच विधी करावा. पदार्थ आपापल्या प्रथेप्रमाणे व कुलदैवताप्रमाणे वेगवेगळे असू शकतात. 
देवास नैवेद्य कसा दाखवावा
खंडोबाला नैवेद्य हा गोड नैवेद्य असतो तसेच त्याला वांग्याचे भरीत, दही व भाकरीचा नेवैद्य दाखवतात. विधी वरीलप्रमाणेच करावा. 
इतकेच काय गणपती व इतर घरातील देव ह्यांनाही अशा प्रकारे नैवेद्य दाखविल्यास तो देवापर्यंत पोचतो असे म्हणतात. त्यामुळे घरात सुखशांती नांदते. अन्नधान्याची कमी कधीही पडत नाही. नैवेद्य दाखवणे हा हिंदू  धर्मातील पूजेचा एक अविभाज्य भाग आहे, त्यामुळे पूजेचे उद्दिष्ट ६० टक्के साध्य होते. 

Sunday, 2 August 2015

हिंदुधर्म व त्यातील जातीसंस्था

हिंदुधर्म व त्यातील जातीसंस्था
कोणत्याही धर्माचा व त्यातील गुणावगुण ह्यांचा अभ्यास नुसताच इतिहासावरून होत नसतो, त्यासाठी तो धर्म जिथे स्थापला गेला, वाढला त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची जीवनपद्धती, उत्पन्नाची साधने, भौगोलिक स्थान हेही विचारात घेणे महत्वाचे असते.
१) हिंदू धर्माचा अभ्यास करताना नुसतेच वैदिक व इतर असा विचार करणे चूक आहे, त्यासाठी हिंदू धर्माची इतर धर्मांशी तुलना केली तर फारच महत्वपूर्ण माहिती हाती लागते.
अ) हिंदू धर्म जिथे वाढला तिथे शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. तसेच नागरिकीकरण झालेले होते. त्यामुळे शेतीवर आधारित समाजरचना अस्तित्वात आली. शेती करणारा, त्या मालाची विक्री (देवाण घेवाण) करणारा व थोडेफार रक्षण करणारा समाज येथे तयार झाला. भारताचा उत्तर, वायव्य भाग दुर्गम असल्याने अंतर्गत भागावर सहसा सतत अक्रमने झाली नाहीत (चंगेज खान हा भारतात न घुसता मध्य पूर्वेत गेला होता त्याआधी खलिफा क्र. १ अनेकदा सिंध पर्यंत येउन माघारी गेला होता कारण त्याच्या सैनिकांनी त्याला सांगितले कि पुढे मोठे वाळवं
आहे तिथे आपल्याला लुटायला काहीच नाही. ).
ब) याउलट इस्लाम, ख्रिश्चन आदि
धर्म हे टोळीवाल्यांच्या प्रदेशात वाढले. त्यांचे थोडेफार पशुपालन होते. त्यांचे प्रमुख उद्योग पशुपालन त्यामुळे पशूंना लागणारा चारा ह्यासाठी भटकणे, अक्रमणे करून लुट मिळवणे हेच होते. त्यात त्यांना वर्ग जाती व वर्ण तयार करणे अशक्य होते. कारण समाज वर्गात विभाजित झाला तर लढाईला संख्याबळ कमी पडत असे. पूर्वी लढल्या संख्याबळावर लढल्या जायच्या हे  वेगळे सांगायची गरज नाही.
क) हिंदू धर्मात रक्षण करणारा वर्ग पूर्वी अस्तित्वातच नसावा कारण त्याची गरज नव्हती. जो रक्षक समाज होता तो फक्त अंतर्गत नियमन करणारा पोलीस सदृश राजा होता.
ड) ग्रामीण भागात जातीय/वर्णीय व्यवस्था अजून टिकून आहे त्याचे कारण तिथे शेती अजून टिकून आहे. वाढत्या शहरीकरणात वर्ण/जातीव्यवस्था गळून पडत आहे हे त्याचेच पुढचे कारण.