देवीस नैवेद्य कसा दाखवावा
तुळजा भवानीस तीन प्रकारचे नैवेद्य वर्षभर दाखवतात.
गोड नैवेद्य: यात पुरणपोळी, गुळवणी, तिखट आमटी, पालेभाजी, कुरडई, पापडी, भजी, वरण भात व त्यावर तूप इत्यादी यांचा समावेश असतो.
दही भात नैवेद्य: यात दही व भात यांचा समवेश असतो.
तिखट नैवेद्य: यात ज्याला बोल्हाई आहे त्यांनी बोल्हाईचे (म्हणजे मेंढीचे) आणि ज्यांना बोल्हाई नाही त्यांनी बोकडाचे मटण व त्याचा रस्सा, कोरडे परतलेले मटण, चपाती किवा भाकरी, कलेजी (शक्य असल्यास) भात, लिंबू, मीठ व कांदा असे पदार्थ येतात.
हे तिन्ही नैवेद्य विनाखंड देवीस दाखवले जातात.
विधी: शुद्ध पाणी घेऊन त्याने प्रत्येक नैवेद्याचे ताट देवीसमोर ठेवण्यापूर्वी एक मंडल (चौकोन) काढावा व त्यावर ताट ठेवावे. तेच पाणी घेऊन ताटाभोवती १ किवा ३ वेळा फिरवावे. नंतर ताटातील प्रत्येक पदार्थाचा लहान तुकडा (सगळे तुकडे हातात मावतील अशाप्रकारे) किवा एक एक घेऊन प्रथम देवीच्या मुखास लावावेत, मग उजव्या आणि डाव्या खांद्यास, मग पायास लावावेत. देवीस नमस्कार करावा. हे तुकडे स्वतः खावेत, कीटाकांस, गाईस द्यावेत किवा पायदळी जाणार नाहीत अश्या ठिकाणी ठेवावेत. राहिलेला नैवेद्य प्रसाद म्हणून खावा. फेकून देऊ नये.
घरात नैवेद्य दाखवताना हाच विधी करावा. पदार्थ आपापल्या प्रथेप्रमाणे व कुलदैवताप्रमाणे वेगवेगळे असू शकतात.
घरात नैवेद्य दाखवताना हाच विधी करावा. पदार्थ आपापल्या प्रथेप्रमाणे व कुलदैवताप्रमाणे वेगवेगळे असू शकतात.
देवास नैवेद्य कसा दाखवावा
खंडोबाला नैवेद्य हा गोड नैवेद्य असतो तसेच त्याला वांग्याचे भरीत, दही व भाकरीचा नेवैद्य दाखवतात. विधी वरीलप्रमाणेच करावा.
इतकेच काय गणपती व इतर घरातील देव ह्यांनाही अशा प्रकारे नैवेद्य दाखविल्यास तो देवापर्यंत पोचतो असे म्हणतात. त्यामुळे घरात सुखशांती नांदते. अन्नधान्याची कमी कधीही पडत नाही. नैवेद्य दाखवणे हा हिंदू धर्मातील पूजेचा एक अविभाज्य भाग आहे, त्यामुळे पूजेचे उद्दिष्ट ६० टक्के साध्य होते.

No comments:
Post a Comment