Thursday, 3 March 2016

ग्रह-तारे आणि आर्थिक नियोजन.

एका "क्ष" व्यक्तीच्या जन्मपत्रिकेचा आणि राशीकुंडलीचा अभ्यास करून धन कसे कमवायचे ह्याचा सल्ला इथे उदाहरणासहीत देत आहे. तर ह्या व्यक्तीची रास आहे धनु. शिवाय राशीस्वामी गुरु हा धनु ह्या स्वराशीला आहे. लाभात सूर्य उच्चीचा (मेषेचा) अशी पत्रिका असलेली हि व्यक्ती आहे. धनु हि रास जशी गुरुबळानुसार बलवान बनते तसेच रवीची गतीही ह्या राशीला फार महत्वाची असते. सध्या ह्या राशीला पाचवा (२-५-७-९-११ यापैकी एक) गुरु आहे, म्हणजे राशीला उत्तम गुरुबळ आहे. ह्या काळात उत्तम आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. 
दुसरे म्हणजे ह्या राशीला साडेसाती चालू झालेली आहे. आता आपण गुरु शनि आणि रवि ह्यांचा एकत्र विचार ह्या पत्रिकेच्या बाबत करू. 
१) गुरुबळ उत्तम म्हणून उत्तम आर्थिक लाभ,
२) रवी हा ह्या राशीला मकर संक्रांतीला धनस्थानात (म्हणजेच मकर राशीला) गेला. रवी हा पापग्रह असल्याने तो ३-६-१०-११ ह्याच स्थानात अनुकूल असतो म्हणून ह्या पत्रिकेला (तो दुसऱ्या स्थानात आल्याने) तो प्रतिकूल होता. नंतर तो कुंभ राशीला १५ फेब्रुवारीला गेला. म्हणजे तो राशीला तिसरा व अनुकूल झाला. 
३) शनीची साडेसाती हि अडीच वर्षे एका टप्प्यात याप्रमाणे तीन टप्पे म्हणजे साडेसात वर्षे चालणार आहे. 
४) ह्या व्यक्तीला राहू दशा चालू आहे. राहू अष्टमात असल्याने २०२० पर्यंत त्याची फळे म्हणजे आप्तस्वकीय ह्यांच्यापासून दूर जाणे, मित्र, जवळची माणसे नसणे, पैशासाठी लोक वाईट वागणे हि आहेत. हि दीर्घकालीन फळे आहेत.

तर ह्या व्यक्तीने काही आर्थिक गुंतवणूक केलेली होती. मकर राशीला रवी येणार म्हटल्यावर धनु राशीच्या लोकांनी सावध व्हायला हवे. नेमके तेच ह्या व्यक्तीने केले. त्याने जानेवारीच्या सुरुवातीला सगळी गुंतवणूक काढून घेतली. वरील चित्रात व्होटसअप मासेज (७ जानेवारीचा) दिलेला आहे. त्यात बँकेचा एजंट पुन्हा कधी गुंतवणूक करणार म्हणून विचारात आहे. तेव्हा ह्या व्यक्तीने फेब्रुवारीच्या मध्याला गुंतवणूक करणार म्हणून सांगितलेले दिसते. 


ती गुंतवणूक वर दिलेल्या चित्राततल्या योजनेत केलेली होती. ह्या योजनेत दरमहा एका लाखाला ६५८ रुपये इतका करमुक्त लाभांश (डिव्हिडंड) मिळत होता. इतका लाभ बँकेत रक्कम दीर्घकालीन ठेव करूनही मिळत नाही. नेमका जानेवारी महिन्यात तो फक्त ०.०२ प्रती युनिट म्हणजे १६५ रुपये इतकाच मिळाला. त्यानंतरच्या महिन्यात (१५ जाने -१५ फेब्रु.) तो मिळालाच नाही. कारण मार्केट अगदीच कोसळले होते. आणि नेमका रवी मेष राशीला (म्हणजे ह्या व्यक्तीच्या राशीला ३रा) पूर्ण अंशात १३ फेब्रुवारीला आला तेव्हा मार्केट परत तेजीत आले. ह्या व्यक्तीने ह्याचा नेमका फायदा घेत फेब्रुवारीच्या शेवटी परत ह्याच योजनेत गुंतवणूक केली.
आता मार्केटने ७७७+४६०+३०० = अशी १५३७ अंशाची उडी घेतली आहे. जेव्ह्या ह्या व्यक्तीने योजनेचे युनिट्स  विकत घेतले तेव्हा त्याची किंमत १२. १६ प्रती युनिट होती तीच आज १२.६० प्रती युनिट झाली आहे. म्हणजे एका लाखाची त्याला ८२२३ इतकी युनिट मिळाली, आणि प्रत्येकी १२. ६-१२.१६ = ०.४४ रुपये इतका आज रोजी फायदा झाला. म्हणजे लाखाला ३६१८ रुपये इतका फायदा झाला. शिवाय लाभांश मिळणार तो वेगळाच.
तर अशा प्रकारचे गुरुबळ, रवी शनीची चक्रे चालू असतात त्यातून आपला नेमका लाभ साधून घेण्यासाठी सावध असणे गरजेचे असते. मार्केट मध्ये मध्यम जोखीम असलेले व्यवहार करण्यास काहीच हरकत नसते. इतकेच कि अतिजोखीम असलेला सट्टा खेळू नये.
(टीप: वरील लेख हा उदाहरणासाठी दिलेला आहे, त्याच्या अनुषंगाने कोणी कुठे आणि कशी गुंतवणूक करावी व होणाऱ्या फायदा तोट्याला लेखक जबाबदार नाही)

Saturday, 20 February 2016

जोगत्या-जोगतीण, वाघ्या-मुरळी

जोगत्या-जोगतीण, वाघ्या-मुरळी  ह्यांचे सामाजिक स्थान हा विषय तसा किचकट आहे, बहुजन समाजाच्या नाजूक भावना इथे गुंतलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रथा चाललेल्या आहेत त्या आपला समाज एका भीतीपोटी सोडायला तयार नसतो. देवाचा किवा देवीचा कोप होईल अशी भावना यामागे असते. तर हे नक्की काय समाजशास्त्र आहे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. ह्या प्रथांमागील समज गैरसमज ह्यांचा अभ्यास करणार आहोत. 
प्रामुख्याने तीन प्रकारचे पंथ आपल्या महाराष्ट्रात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात आढळतात.

१) वाघ्या-मुरळी:
२) तुळजापूरच्या भवानी देवीची माळ परडी असणारे; व जोगवा मागणारे:
३) यल्लमा देवीचे भक्त आराधी (जोगता, जोगतीण) जोगवा मागणारे:

१) वाघ्या-मुरळी: हे खंडोबा देवाचे भक्त होत. पूर्वी बरेच प्रयत्न करून ज्यांना संतान सुख मिळत नाही असे लोक खंडोबाला नवस बोलत आणि नवसाच्या पूर्ततेसाठी होणारे पहिले मुल, वाघ्या किवा मुरळी हे देवाला अर्पण करीत. देवाची कृपाच म्हणा कि ह्या मार्गाने अनेकांना मुले झालेली आहेत आणि ही प्रथा टिकून आहे. ह्या वाघ्या-मुरळीने आयुष्यभर ब्रम्हचारी राहून देवाची सेवा करणे अपेक्षित होते. देवाची स्तुतीपर गाणी गाऊन, तसेच जागरण गोंधळाचे कार्यक्रम करून आपला चरितार्थ चालवले आणि देवाच्या कार्याचा इतिहास लोकगीतांच्या माध्यमातून प्रवाहित ठेवणे असे दोन उद्देश ह्यामागे आहेत. 
खंडोबा जरी लगेच प्रसन्न होणारा देव असला तरी त्याचे नवस फार कडक आहेत, त्याचे प्रकार म्हणजे पायी वारी करणे (दर सोमवती अमावस्या, खंडोबाचे घट यांच्यावेळी आपल्या घरापासून पायी खंडोबाला जाणे), पाठीला लंगर (एक हुक) अडकवून देवाची प्रदक्षिणा करणे, अगीवरून चालणे, किवा वाघ्या-मुरळी सोडणे असे नवसाचे प्रकार आहेत. आत्ताच्या वैज्ञानिक युगात हे प्रकार अतिशय भयानक वाटतात पण आपल्या पूर्वजांना हे करण्याशिवाय पर्याय नव्हते हेही तितकेच खरे आहे. सर्वात जास्त सामाजिक परिणाम वाघ्या-मुरळी प्रथेचे आहेत. बळजबरीने ब्रम्हचारी व्हायला लागल्याने वाघ्याच्या जीवनातील अर्थ नष्ट झाल्यासारखा वाटतो, तर अविवाहित राहिलेली मुरळी म्हणजे सार्वजनिक मालमत्ता असा एक समज एकेकाळी झालेला होता. त्यात दोन्ही बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे. एकतर एकटी स्त्री म्हणजे आपली भोगवस्तू अशी समाजातील सबळ घटकांची प्रवृत्ती असते. तसेच स्त्रीलाही काही शारीरिक गरजा असतात हा दुसरा भाग. 
त्यातील पहिला भाग जो आहे तो आपणच सामाजिक प्रबोधनाने टाळू शकतो. आधी आपण हे समजून घ्यायला हवे कि ती स्त्री एक स्वतंत्र नागरिक आहे, ती एकटी आहे आणि आपण आर्थिक, सामाजिक दृष्ट्या बलवान आहोत म्हणून तिला उपभोगुन सोडून देणे कितपत योग्य आहे. 
दुसरे असे कि वाघ्याचा घरवाघ्या नावाचा प्रकार असतो, तो घरात राहून संसारी जीवन जगतो, विवाह करू शकतो पण एकदा वारीस जाणे देवाची स्तुती करणे ही कामे करणे गरजेचे असते. तसेच मुरळीला का असू नये?
मुळात वाघ्या-मुरळी ह्यांचा उद्देश देवाची स्तुती करण्यासाठी आहे हे समजून घेतले तर पुढचे प्रश्न आपोआपच सुटतात. मुरळीही घरात राहून देवाची सेवा करू शकते. स्तुती गाऊ शकते. एका पुरुषास किवा स्त्रीस आपल्या देवाचा कोप न ओढवून घेता, सामाजिक अवहेलानेच्या दरीत लोटण्यापेक्षा हा मार्ग योग्य आणि समर्पक आहे. 
२) तुळजापूरच्या भवानी देवीची माळ परडी असणारे; व जोगवा मागणारे: बर्याच घरात वंशपरंपरेने माळ परडी, पोत इत्यादी चालत आलेले असते. ते टाकून कसे द्यायचे असा प्रश्न पुढे उभा राहतो. तसेच घरात माळ परडी असणे म्हणजे ते कडक नियम पाळायचे हे आलेच. 
छत्रपति शिवाजी महाराज हे कुलदैवत तुळजाभवानीचे परम भक्त होते. ते स्वतः गळ्यात कवड्यांची माळ घालून हातात परडी घेऊन देवीचा जोगवा मागत असत असे सांगितले जाते. जोगवा शब्द हा जोग-योग म्हणजेच योगी (वैराग्य) ह्या शब्दावरून साधला आहे. वैराग्याशिवाय योग साधणे अवघड आहे. योगी जे मागतो तो योगवा अर्थात जोगवा. ह्यामागे शिवाजींच्या व्यक्तिमत्वाची दोन वैशिष्ठ्ये स्पष्ट होतात.
१) संसारी जीवनात राहूनही ते योगीत्वात (वैराग्य) गेले होते.
२) जोगवा अर्थात भिक्षा मागणे ह्यामागे स्वतःला गर्व न होऊ देणे हा उद्देश आहे. 
तर सांगायचा उद्देश हाच कि तुळजाभवानी देवीचा जोगवा मागणे म्हणजे लाजिरवाणे असे काही नाही. त्यासाठी अराधीच असायला हवे असेही काही नाही. जोगवा मागणारे सगळेच भिकारी आहेत असा दृष्टीकोन ठेवणे हेही चुकीचे आहे. माळ परडी असणारे लाखो भक्त तुळजापूरला आढळतात, ते त्यांचे संसारी जीवन व्यवस्थित जगतात. नियम पाळायचे म्हणाल तर थोडा संयम व हट्टीपणा सोडला तर सगळे सुरळीत होते. 
पुढे बर्याचदा ज्यांच्या घरात माळ परडी आहे त्यांचा अंगात येते असाही समज आहे. हे थोडेफार खरे आहे असे म्हणावे लागेल. माझा असा अनुभव आहे कि माळ परडी असलेल्या घरात एक किवा अधिक संततीला मंगळ असतो, डोके तापट असते. संसारात अडचणी उत्पन्न होतात. पटत नाही. अशावेळी एक साधा उपाय करावा. आपल्याला अंगात आल्यासारखे वाटत असेल तर तुळजापूर देवीच्या मंदिरात जाऊन सरळ देवीला निवेदन करावे कि मला प्रापंचिक कारणांमुळे हे देवी तुझा हा संचार करवून घेणे सध्या शक्य नाही तेव्हा मला क्षमा कर. मी तुझी नित्यनेमाने सेवा करील. विशेष म्हणजे हे मला एका जेष्ठ पुजार्याच्या ८१ वर्षीय आईने सांगितले आणि हा खरेच परिणामकारक उपाय आहे.  
३) यल्लमा देवीचे भक्त आराधी (जोगता, जोगतीण) जोगवा मागणारे: इथे मात्र गंभीर प्रश्न आहेत, स्त्रीची जट (म्हणजे केसांचा गुंता) झाला कि तिला जोगतीण म्हणून सोडून द्यायचे, तसेच लैंगिकदृष्ट्या असमर्थ, लघवीतून रक्त जाणे इत्यादी कारणास्तव पुरुषास सोडून द्यायचे अशी ही प्रथा आहे.नवसाचा हि प्रकार इथे असतोच. आत्ता झालेल्या वैज्ञानिक प्रगतीच्या काळात वरील कारणे उपाय करून दूर करता येतात. पण आपल्या समाजात अजून दूर खेड्यात प्रगती पोचलेली नाही. गरिबीमुळे मुले सोडून देणार लोकही आहेत. तर असो. 
मूळ उद्देश इथेही देवीचे भक्त बनून तिची स्तुती करणे हेच आहे. एखाद्या जोगत्याचा अनैसर्गिक लैंगिक छळ करणे हे चुकीचे आहे. आपल्या धर्माला समलिंगी संबंध मान्य नाहीत म्हणून आपण हिरहिरीने सांगतो पण आपल्याच समाजात ह्या आराधी लोकांबरोबर बीभत्स वागणारे लोक आहेत त्यावर आपण मुग गिळून गप्प बसतो हे चुकीचेच आहे. तसेच जोगतीण हिलाही देवीची सेवा करत असताना संसारी जीवन जगण्यात काहीच गैर नाही. कारण तसेही तिचा उपभोग समाज घेतो तो स्वार्थी उद्देशाने घेत असतो. तिथे जी शरीर क्रिया होणार आहे तीच संसारी जीवनात तिची नवऱ्याबरोबर होणार आहे. तसेच असा विचार करा की योगायोगाने समजा मोकळ्या समाजात फक्त एकच पुरुष तिला भेटला आणि त्याच्याबरोबरच संभोगाची क्रिया घडली तर ती वाईट का? आणि अनेकांबरोबर घडली तर चांगली? म्हणून जोगतीनीने संसारच करू नये हे म्हणणे चुकीचेच आहे.
एखादा आराधी ज्या हिडीसपणे वागत असतो त्याला समाजाने दिलेल्या अवहेलनेचे कारण आहे हे आपण समजून घेतले पाहिजे, तोही एक माणूस आहे त्यालाही जगण्यासाठी सामाजिक प्रतिष्ठा आवश्यक आहे हे समजून घेतले पाहिजे. शारीरिक सुख हे थोडा काळ अस्तित्वात असते नंतर सामाजिक प्रतिष्ठा गरजेची असते हे मुले मोठी करताना आपल्यासारख्या संसारी स्त्री- पुरुषांना वयाच्या चाळीशीत समजते.  

शेवटी सगळे प्रश्न पोटाकडे येउन थांबतात, एकेकाळी पोट भरण्याची साधने तुटपुंजी असताना व जन्माधारित व्यवसाय असताना वरील पंथ हे पोट भरून उपजीविका करण्यास बनवले गेले असे म्हटले तर वावगे ठरू नये. नंतर काही सामाजिक विकृती त्यात घुसल्या हेही स्पष्ट दिसते. अन्यथा ह्या संस्थेचा मूळ उद्देश पवित्र आहे, गीत  संगीताची उपासना करून एक लोककलेचा वारसा जपणारा हा पंथ आहे. तो एक संस्कृती म्हणून आपण जपणे त्यातील चुकीच्या आणि विकृत प्रथा छाटून टाकून हा वृक्ष जोपासणे नक्कीच आनंददाई आहे. 









Friday, 12 February 2016

भविष्यकथन

भविष्यकथन हा ज्योतिषशास्त्रातला सर्वांना हवाहवासा वाटणारा विषय आहे. समोर ज्योतिषी दिसला कि जन्मकुंडली पुढे टाकून किवां हात पुढे करून प्रत्येक जण भविष्य विचारतो. ज्योतिष्य सांगणारा सुद्धा अशावेळी फॉर्मात येतो आणि आपले जे काही ज्ञान आहे त्याच्या जोरावर भविष्य सांगायला सुरुवात करतो.
ज्योतिष्यशास्त्र बदनाम होण्याचे एक कारण हेही आहे कि बऱ्याच ज्योतिष्यांना भविष्यकथन या प्रकारची पूर्ण माहिती नसते. त्यात नाडीज्योतिष्य, हस्तरेषा आणि जन्मपत्रिका यावरून असे भविष्य कथनाचे प्रकार आहेत. हात पाहून भविष्य सांगणे हा तसा सोपा प्रकार आहे पण त्यात अचूक कालनिर्णय (१-२ महिन्याच्या अंतराने) करता येणे शक्य नाही. कारण हातावरच्या रेषा साधारणतः ६० ते ७० वर्षांचे आयुष्य दर्शवितात त्यात १-२ महिन्याची अचूकता शोधणे म्हणजे १ मिलीमीटर लांबीच्या रेषेचा अभ्यास करून भविष्य सांगणे असा होतो व ते फारच अवघड काम आहे. आत्ता आपण हस्तरेषा किवा नाडीभविष्य याचा विचार न करता फक्त जन्मकुंडलीप्रमाणे भविष्यकथन याविषयी माहिती करून घेऊयात. 
बहुतेक लोकांचा असा समज असतो कि जसे आकाशातील ग्रह तारे बदलतात तसे माणसाचे नशीब बदलत असते, पण हे चुकीचे आहे. माणसाचे प्राक्तन हे खरेतर ग्रहदशेप्रमाणे बदलत असते. ग्रहदशा आणि त्यातील अंतर्दशा हि साधारणतः १ ते २ वर्षे टिकते. एका ग्रहाची महादशा ५ ते २१ वर्षे असते तर त्या अंतर्गत दुसऱ्या  किवा त्याच ग्रहाची अंतर्दशा १ ते २ वर्षे अशा स्वरुपात चाललेली असते. महादशेचे फळ हे विस्तृत असते. त्या काळात माणसाच्या आयुष्याचा ठराविक टप्पा अधोरेखित होतो. जसे बालपण, शिक्षणावस्था, नोकरी-व्यवसाय व अर्थार्जन, संसार व संतती-सुख, म्हातारपण हे सगळे महादशेचे टप्पे असतात. त्यात अंतर्दशा हि शिक्षणात होणारे बदल, नोकरीत होणारे बदल, संसार सुखात /संतती सुखात होणारे बदल दर्शवित असते. एका ग्रहदशेत साधारणतः एकंदर परिस्थिती स्थिर असते. फारश्या उलाढाली होत नाहीत. इतकेच काय एखादा माणूस मृत्यू पावला तरी त्याचे बँकेतील पैसे, त्याचे कुटुंब हे एका ठराविक स्थिर अवस्थेतच राहते. फार परिवर्तन होताना दिसत नाही. ग्रहदशेचे फलित अचूकपणे सांगणे फारच कौशल्याचे काम आहे. मूळ जन्मपत्रिकेतील त्या ग्रहाचे स्थान, त्याचे उच्च-नीचत्व, त्याचे नक्षत्र यावरून दशेचे फलित कळते. तसेच जन्मापासून काही ठराविक काळापर्यंत ग्रहांच्या दशेचे फळ मिळत नाही. मुल जेव्हा आईच्या पोटात असते तेव्हा त्याला चंद्रदशा म्हटले जाते. जन्माला आल्यापासून ५ वर्षे मातृदशा, तर १२ व्या वर्षापर्यंत पितृदशा, पुढे १६ व्या वर्षापर्यंत राष्ट्रदशा असते. नंतर त्यापुढे ग्रहदशा फळे द्यायला सुरुवात करते. मातृदशा, पित्रुदशा, किवा राष्ट्रदशा याचा अर्थ एखाद्या व्यक्तीवर त्यांच्या आई, वडील आणि ज्या प्रदेशात ती व्यक्ती राहत असते त्यांचा परिणाम. 
मग माणसाच्या आयुष्यात चोरी, अपघात, विवाह, नोकरीचा लाभ अश्या अनेक घटना अचानक घडतात त्यांचे कारक कोण असते असा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येतो. तर हा गोचरीच्या ग्रहांचा प्रभाव असतो. प्रत्येक गोचरीचा ग्रह व त्याची इतर ग्रहांबरोबर होणारी युती हि मानवाच्या आयुष्यात एक संधी, संकट, शुभ/अशुभ योग घेऊन येत असते. गुरु-चंद्र, गुरु-मंगळ, रवि-गुरु इत्यादी शुभ संधी असतात, तर शनि-मंगळ, शनि-रवि, शनि-राहू, राहू-मंगळ हे अशुभ योग होत. अशा संधींचा योग्य फायदा उठवणे व मिळणे हे माणसाच्या जन्मकुंडलीतील ग्रहांच्या गुणधर्मानुसार ठरते. एखादे संकट प्राणावर न बेतता सुटका होते तर दुसर्याचा बळी जातो असे गोचरीच्या ग्रहांमुळे सतत चढउतार होत राहत असतात. 
म्हणून भविष्यकथन हा मोठा गुंतागुंतीचा व कौशल्याचा प्रकार आहे. तरीही आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींचे अनुमान करण्यासाठी काही ठोकताळे आहेत त्यांचा आपण थोडक्यात विचार करूयात. 
पुरुषाच्या विवाहाचे वय: पुरुषाच्या विवाहाचा योग त्याच्या जन्मकुंडलीतील राहूच्या योगात ज्यावेळी गुरु येतो तेव्हा सुरु होतो. राहू-गुरु एकत्र असणे, किवा राहुपासून पासून गुरु चवथा, सातवा असणे असा हा योग असतो. ह्यावेळी जेव्हा-जेव्हा गोचरीत मुलाला गुरुबळ येते (गुरु २-५-७-९-११ व्या स्थानी असणे) तेव्हा विवाह घडून येतो. 
स्त्रीच्या विवाहाचे वय: स्त्रीच्या विवाहाचे वय हे पूर्णपणे गोचरीच्या गुरुप्रमाणे असते, गुरुबळ उत्तम असता (गुरु २-५-७-९-११ व्या स्थानी असणे) विवाह जमू शकतो. 
मूळ जन्मकुंडलीत खराब योग, करण, नक्षत्र असेल तर शांती/उपाय करून विवाह लवकर ठरतो. मंगळ असेल तर समोरचा मुलगा/मुलगी यांची पत्रिका अनुकूल असेल तरच योग येतो. तोवर विवाह जुळण्यात अडचणी व मनस्ताप सहन करावा लागतो. 
नोकरी लागण्याचा, प्रमोशन यांचा कालखंड लग्नेश-दशमेश यांच्या योगावर अवलंबून असतो. 
तर अशा प्रकारे भविष्यकथन केले जाते. आपण जे वर्तमानपत्रात भविष्य वाचतो ते खरेतर भविष्य नसून फक्त येणाऱ्या संधी किवा संकटे यांची चाहूल दिलेली असते, त्यावर कसे आपण कसे वागणार यावर खरे फळ अवलंबून असते. साडेसातीचेही तसेच असते. आपण एखाद्या संधीवर किवा संकटावर कसे व्यक्त होतो यावरच आपले खरे प्रारब्ध अवलंबून असते. याशिवाय काही ज्योतिष्यांना वाचाशक्ती वगैरे प्रकार असतो ते कदाचित अध्यात्मिक शक्तीच्या जोरावर किवा जातकाला काही दैवी उपाय सांगून हवे ते घडवून आणू शकतात. पण मला त्याविषयी फारसे माहित नाही. 

Wednesday, 13 January 2016

प्रतिकूल ग्रह: जप, शांती व दान

बऱ्याचदा जीवनात असे प्रसंग येतात कि अचानक प्रतिकूल गोष्टी घडू लागतात, अंगात उत्साहच राहत नाही, भयंकर निराशा येते. त्यामुळे पुढे देवावरचा विश्वास उडू लागतो. अश्या वेळी थोडे तपासले तर गोचरीचे ग्रह चांगले नसतात हे अनुमान निघते. पुढे दिलेले दाते पंचांगातील गोचरीच्या ग्रहांचे वर्णन वाचा,

सर्वात आधी गुरूचा विचार करूया, गुरु ज्या राशींना (चंद्र-राशी) ४-८-१२ वा येतो तेव्हा तो त्या राशीच्या लोकांना प्रतिकूल समजला जातो. सगळ्याच स्तरांवर अपयश येत राहते. अशा व्यक्तीला कसलाच उत्साह, इर्षा नसते मग अपयश येणे साहजिक आहे. गुरूचा अशुभस्थानी एकंदर वाईट परिणाम असतो व पीडा परिहारार्थ  जप, दान, पूजा इत्यादी करावे असे सांगितले आहे. त्यातले त्यात गुरूच्या राशींना गुरुबळ नसताना (म्हणजे ४-८-१२ स्थानी गुरु असताना) जास्त त्रास होतो. धनु राशीचा सचिन तेंडूलकर कधीकधी धावांचा पाऊस पाडत होता तर दुसरीकडे सलग कित्येकदा भोपळा देखील फोडू शकत नव्हता हे आपण पहिले. १-३-६-१० व्या स्थानात असणारा गुरुही इतका चांगला नसला तरीही जप, दान, पूजा यापैकी एक केल्याने आपली सुटका होऊ शकते असेही वर दिलेले आहे. 
आपण आत्ता सर्वात प्रतिकूल (४-८-१२) गुरुचाच अभ्यास करू. सगळ्यात सोपे म्हणजे काय तर दान करायचे. आता ह्या दानाच्या वस्तूमध्ये नेमका घोडा येतो. आता हा घोडा आणायचा कोठून? म्हणून मग मार्ग असा काढला जातो की, घोड्याच्या शेपटीचा केस किवा कणकेचा घोडा दान करावा. आहे कि नाही गम्मत. आजकाल गुरूच्या सुवर्णाची प्रतिमासुद्धा दिवसेंदिवस लहान होत चालली आहे. दानाच्या इतर वस्तू सामान्य माणूस कसातरी जमवू शकतो.  पण खऱ्या घोड्यासाठी कणकेचा घोडा हे काही त्याला पटत नाही.
आता पूजा/शांतीचा विचार करू, शांती करायची म्हणजे साहित्य लागते , दान/दक्षिणा आले त्याचा सगळ्याचा एकंदरीत खर्च ७ ते १० हजाराच्या घरात जातो. म्हणजे गाडी परत तिथे येउन थांबते. 
पुढचा मार्ग म्हणजे जप करायचा. पण जपाचा आकडा बघा किती आहे ते. सुमारे १९०००!. शिवाय हे पुढचे पान वाचा. हे धर्मशास्त्रीय निर्णय भाग -१ ह्या दाते पंचागावरील स्पष्टीकरणातील त्यांच्याच पुस्तकातील एक पान आहे. 

कलियुगात कुठल्याही मंत्राचा जप चौपट करावा असे सांगितले आहे. म्हणजे गुरु ग्रहाचा मंत्र १९००० x ४ = ७६००० वेळा म्हणायला हवा. कारण पंचांगातील मंत्रसंख्या ज्या ग्रंथांतून घेतली त्यात हाच आकडा दिलेला आहे, त्यामुळे पंचांगातील आकडा चौपट करून जप करायला हवा असा अर्थ होते. गुरु ग्रहाचा मंत्र खालीलप्रमाणे आहे,

 हा मंत्र व्यवस्थित म्हणायला १७ ते २० सेकंद लागतात. म्हणजे ७६००० वेळा म्हणायला ७६००० गुणिले २० = १५२०००० सेकंद लागतात,  म्हणजे ४२२३ तास, अगदी दिवसाला ८ तास मंत्रजप केला तर ५२८ दिवस लागतात. पण खरोखर गुरुजी तुमच्यासाठी असे जप करीत राहिले तर बाकीचे उद्योग कधी करणार?
मी हा प्रश्न अनेक गुरुजींना सहजच विचारला, तेव्हा दोन उत्तरे मिळाली. एक म्हणजे अम्ही जवळपास २०-२५ गुरुजी एकत्र बसतो, एकजण मंत्र म्हणतो व बाकीचे श्रावण करतात, म्हणजे तो २०-२५ वेळा जप केल्यासारखा होतो. ते तत्व पूर्वी खरे होते कारण मोठ्या संख्येने धार्मिक कृत्ये केली जात. पण आज पाहिले तर एका माणसाच्या शांतीसाठी रोज आठ तास याप्रमाणे २०-२५ गुरुजींना २३ दिवस बसावे लागेल. शक्य वाटते का? मंत्राजपाचा हजारी दर २५० ते ४०० रुपये आहे. तरीही हे गुरुजींना आत्ताच्या महागाईत परवडणार नाही. 
दुसरे म्हणजे एका गुरुजींनी सांगितले कि आम्ही सरळ एक लक्ष गायत्री मंत्र करून मोकळे होतो. एकतर गायत्री मंत्र हा ब्राम्हनाला पापक्षालनासाठी आहे. म्हणजे एखाद्याच्या जपासाठी दक्षिणा घ्यायची आणि ते काम प्रत्यक्ष केले नाही हे पाप झाले म्हणून १ लक्ष गायत्री करायचा!! यावर दुसरा प्रतिवाद गुरुजी हा करतात कि सूर्य हा ग्रहांचा राजा, सुर्य आणि गायत्री यांचा महत्वाचा संबंध. म्हणून सूर्यालाच प्रसन्न केले तरी चालते. आता ह्याला काय म्हणायचे? असो. 
तर ह्या सगळ्या पळवाटा आहेत, आपला व्यवसायही चालवा आणि लोकांना कार्य/शांती केल्याचे समाधानही लाभावे असा दुहेरी हेतू ह्यांत दिसतो. पण जो माणूस बुद्धिवादी असतो तो हे सगळे पाहून गोंधळून जातो. त्याला सगळे थोतांड वाटू लागते. किवा जे शक्य नाही ते करण्यात अर्थ नाही असा त्याचा मनाचा समज तो करून घेतो.

इथे मला थोडे पुढे जाऊन महत्वाचे सांगायचे आहे, मंत्र-जप हा मार्ग श्रद्धेशी निगडीत आहे. त्यामुळे तूर्तास मंत्राची संख्या गौण समजली तर आपण स्वतःही हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. 
१) सरळ नेटवर जाऊन गुरु ग्रहाचा मंत्र डाऊनलोड करायचा, म्हणजे उच्चारात चूक व्हायला नको. 
२) हा मंत्र ज्या व्यक्तीला गुरु ग्रहासंबंधी अडचणी आहेत त्याच्या कोणत्याही नातेवाईकाने (जसे आई, वडील, भाऊ, बहिण) अथवा स्वतः संगीत माध्यमात चालू करून ऐकावा. जितके शक्य असेल तितक्या वेळा. मनात अमुक अमुक व्यक्तीचा त्रास कमी व्हावा हा संकल्प करावा. नाहीतरी गुरुजीही तसेच करून जप पूर्ण करीत असतात. उलट आपली श्रद्धा आणि भावना आपल्या नातेवाईकाशी जास्त उत्कट असते. 
शिवाय जे दान करायचे आहे त्यातील शक्य ते पदार्थ दान करावेत. गुरु ग्रहाच्यासाठी द्यावयाच्या वस्तू (घोडा सोडून) देऊन टाकावे. एखाद्या गरिबाला मंदिरात जाउन दान केले तर फारच उत्तम. (टीप १ वाचा)

हा उपाय मी आपणासर्वांबरोबर वाटतोय कारण याचा चांगला अनुभव अनेक लोकांना आलाय. बर्याचदा गरीब लोक अडचणीत असतात त्यांना काय उपाय सांगायचा, साधे साधे प्रश्न लोक घेऊन येतात, कित्येक लोकांचे घटस्फोट होण्याच्या मार्गावर असतात, पण कारणे कळत नसतात. उपाय करायला बर्याचदा येणाऱ्या खर्चामुळे आणि त्यामध्ये असलेल्या गोंधळामुळे लोक तयार होत नाहीत. पण थोड्या श्रमाने सगळे सुरळीत होते /होऊ शकते तसेच आत्ताच्या जीवनशैलीशी आपल्या प्राचीन शास्त्रांशी योग्य सांगड घातली तर त्यांची अप्रतिम फळे मिळतात, हे समजणे महत्वाचे आहे. 

 गुरु ग्रहाचे अशुभ स्थानातील दुष्परिणाम काय आहेत ते सांगतो,
१) विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होते, त्यांचे लक्ष न लागणे. आजारपण, मानसिक आजार तयार होणे. 
२) नोकरीत त्रास निर्माण होणे, नोकरी जाणे, व्यवसायात मंदी असणे. आळस निर्माण होणे. 
३) मुलींच्या बाबतीत विवाह न जुळणे, अपेक्षित किवा अजिबात स्थळे न येणे. 
४) विवाहीतांत वैवाहिक वाद, विसंवाद निर्माण होणे, संशय तयार होणे. 
शाळेत लक्ष लागत नाही म्हणून शाळा सोडून देणे, किवा पतीपत्नीत वाद झाले म्हणून घटस्फोट देणे/घेणे वाटते तितके सोपे नसते. ह्या तात्पुरत्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींचे दूरगामी परिणाम फार भयंकर असतात. सगळ्यांची कारणे तितकीच गमतीची असतात.

आता थोडे शनीचे कारस्थान बघूया. शनि फक्त ३-६-१०-११ ह्या स्थानात शुभ असतो. तसेच १२-१-२ ह्या स्थानात असताना साडेसाती असते. २-४-५-७-८-९ ह्या स्थानात गोचरीचा शनि असताना फार शुभ फळे देत नाही. आपण आत्ता फक्त साडेसातीचा विचार करूया. 
१)साडेसातीत पूर्वी घडलेल्या घटनाचे परिणाम प्रकर्षाने दिसतात, जुनी, खुन्नस, मनातील आकस ह्यांनी प्रेरित होऊन इतर लोक साडेसाती असलेल्याला त्रास देतात. 
२)साडेसातीत माणसाचा चांगुलपणा, देव इत्यादींवरील विश्वास नाहीसा करणारी माणसे भेटतात, घटना घडतात. ३)माणूस खूप झटत असतो (व झटण्याची शक्तीही भरपूर असते जी विशेषतः गुरूच्या अशुभ वेळी अजिबात नसते) पण त्याला जे अपेक्षित असते ते होत नसते व दुसरेच काहीतरी घडत असते. ते चांगले किवा वाईटही असते, जरी चांगले असले तरी त्याला त्याची किंमत वाटत नाही. 
४)मनावर एक अज्ञात दडपण असते त्यामुळे तो निर्भीडपणे निर्णय घेत नाही. कोणावर सहजी विश्वास ठेवत नाही. कारण पूर्वी वाईट अनुभव त्याला आलेले असतात. एकूणच माणसाची सर्वच प्रकारची वाढ खुंटते. शनीला अनुकूल करण्यास म्हैस दान करावी लागते. तीही आजकाल कणकेची दान करतात !!. 

तर अशी असते साडेसाती, मानले तर भरपूर आणि देवावर श्रद्धा असेल तर काहीच वाईट होत नाही. 
शनीचा मंत्र देऊन हा लेख संपवतो. पुढे अशुभ जन्म-योग/करण/नक्षत्र ह्यांची शांती म्हणजे काय यावर आपण चर्चा करूया, अन्यथा दोन्हींचा एकत्रित विचार केला तर फारच मोठे बौद्धिक तयार होईल. त्यातही मोठ्या गमतीजमती आहेत ते पुढे आलेच!!
टीप-१: दान करताना ते सत्पात्री दान असावे असे म्हटले जाते. सत्पात्री म्हणजे चांगल्या माणसाला असा अर्थ होतो, भिकारी हा चांगला माणूस असतोच असे नाही. कारण भिकारी बनण्याआधी कदाचित त्याने अनेक पापे केलेली असू शकतात. म्हणून सत्पात्री दानाचा एक अर्थ विवेकाने वागणाऱ्या चांगल्या व्यक्तीला (ब्राम्हणाला) द्यावे असा होतो. दुसरा अर्थ ज्याला गरज आहे अशा माणसाच्या पात्रात दान करणे. ह्यात गरजू, भिकारी किवा ब्राम्हण हे सगळेच येतात. दुसरा अर्थ अधिक समर्पक वाटतो. 
टीप-२: कणकेची म्हैस किवा घोडा बनवून दान करणे ह्याला फक्त स्वतःचे समाधान इतकाच अर्थ आहे. नंतर ती कणकेची म्हैस किवा घोडा चक्क फेकून दिले जातात. त्याचा कोणालाही काहीही उपयोग होत नाही. 

Saturday, 9 January 2016

अंकशास्त्रीय लबाड्या आणि लूट

पुण्यात एक प्रथितयश अंकशास्त्री आहेत. शिवाय ते स्वतःला मानसोपचारतज्ञ, उद्धारक (मोटीव्हेटर) वगैरे मानतात. कुतुहूल म्हणून मी नेहमी त्यांचे लेख वाचतो. अंकाशास्त्रीय नियम स्वतःलाही लावून बघतो. प्रत्येक शास्त्रात काहीतरी गूढ दडलेले आहे ही माझी खुळी आशा. तर त्यांचा लेख त्यांचे नाव न देता इथे देत आहे. त्यानंतर त्यांचा व माझा संवाद झाला तोही इथे देत आहे, मग शेवटी आपण पाहूया की लबाड्या कशा केल्या जातात ते. 
.
.
छत्रपती शिवाजी महाराज अंकशास्त्राच्या नजरेतून
© त्यांचे नाव
९९९ त्यांचा मोबाईल नंबर९९९९ ,
९९९ त्यांचा मोबाईल नंबर९९९९
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी येथे झाला. अंकशास्त्राच्या दृष्टीने ही तारीख 'युनिक' प्रकारची आहे.
19 हा अंक अंकशास्त्रात 1+9=10=1+0=1 असा होतो. याला जन्मांक (Birth Number) असे म्हणतात. जे लोक कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेस जन्मले त्या सगळ्यांचा जन्मांक 1 येतो.

अंकशास्त्रानुसार 1 हा अंक सर्वात चांगला व महत्वाचा अंक मानला गेला आहे. ज्यांचा जन्मांक 1 असतो त्या व्यक्ति स्वयंभू, दूरदृष्टीचे, महत्वाकांक्षी, प्रचंड नेतृत्वगुण असणारे, हाती घेतलेले कोणतेही काम तडीस नेणारे, दुय्यम स्थान न स्वीकारणारे, भावनांपेक्षा कर्तव्याला महत्व देणारे, शिस्तप्रिय असे असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्यात हे सगळेच गुण एकवटलेले दिसतात.
अंकशास्त्रात जन्मांकाप्रमाणेच भाग्यांकाला (Life Path Number) देखील महत्व आहे. भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेतील सर्व अंकांची बेरीज. महाराजाची जन्मतारीख 19.2.1630 आहे. यातील अंकांची बेरीज 1+9+2+1+6+3+0=22 अशी येते. 22 हा नंबर मास्टर नंबर मानला गेला आहे आणि तो फारच थोड्या लोकांच्या वाट्याला येतो. शिवाय जन्मांक 1 आणि भाग्यांक 22 ही तर फारच दुर्मिळ गोष्ट.
जन्मांक आणि भाग्यांक हे दोन्ही त्या-त्या व्यक्तीच्या जीवनात घडणा-या घटनांवर प्रभाव टाकतात. तसेच पूर्ण जन्मतारखेत एखादा अंकगट दिसत असेल तर त्यातील अंकही घटनांवर प्रभाव टाकतात. 19.2.1630 या जन्मतारखेत 3,6,9 हे एका गटातील तीनही अंक आलेले दिसतात. तसेच 1630 यातील सर्व आकड्यांची बेरीज 1 होते. (बहुतेकांच्या बाबतीत त्यांच्या जीवनात कांही ठराविक तारखा रिपीट होत असलेल्या दिसतात).
आता आपण शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना पाहिल्या तर त्या ज्या तारखेची एक अंकी बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसतात. पुढील घटना पहा:
(कंसातले अंक त्या त्या तारखेची/महिन्याची/सालाची अंकातली किम्मत).

जन्म: 19 (1) फेब्रुवारी 1630 (1)
जावळी ताब्यात घेतली: 15 (6) जानेवारी (1) 1656 (9)
रायगड किल्ला जिंकला: 6 एप्रिल 1656 (9)
अफजलखानाची भेट व त्याचा वध: 10 (1) नोव्हेंबर 1659 (3)
प्रतापगडचे युद्ध: 10 (1) नोव्हेंबर 1659 (3)
कोल्हापूरचे युद्ध: 28 (1) डिसेंबर (3) 1659 (3)
मोगल सरदार करतलब खान याचा पराभव केला: 3 फेब्रुवारी 1661
सुरतेवर स्वारी: 6 जानेवारी (1) 1664
सिंधुदुर्ग हा समुद्री किल्ला बांधला: 24 (6) नोव्हेंबर1664
औरंगजेबाच्या दरबारात: 12 (3) मे 1666 (1)
आग्र्याहून सुटका: 19 (1) ऑगस्ट 1666 (1)
राजाराम महाराजांचा जन्म: 24 (6) फेब्रुवारी 1670
तानाजीने कोंढाणा किल्ला जिंकला: 15 (6) मार्च (3) 1670
पुरंदर किल्ला पुन्हा घेतला: 24 (6) मार्च (3) 1670
सुरतेवर दुसरी स्वारी: 3 ऑक्टोबर 1670
राज्याभिषेक: 6 जून (6) 1674 (9)
दुसरा राज्याभिषेक: 24 (6) सप्टेंबर (9) 1674 (9)
जिजाउंचा मृत्यू: 18 (9) जून (6) 1674 (9)
महाराजांचा मृत्यू: 3 एप्रिल 1680 (6)

विशेष म्हणजे महाराजांचे वडील शहाजीराजे यांची जन्म तारीख 18 (9) मार्च (3) तर आई जिजाउंची जन्मतारीख 12 (3) जानेवारी (1) ही होती.
याशिवाय महाराजांच्या आयुष्यातील कांही महत्वाच्या घटना ज्यांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसत नाहीत, पण त्या ज्या साली घडल्या, त्या सालातील अंकांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते. त्या घटना अशा:
पुरंदर किल्ला घेतला: 1648=1+6+6+8=19=1+9=10=1+0=1
संभाजी महाराजांचा जन्म: 1657=1+6+5+7=19=1+9=10=1+0=1
सईबाई यांचा मृत्यू : 1659=1+6+5+9=21=2+1=3
पुरन्दरचा तह: 1665 = 1+6+6+5 = 18 =1+8 = 9
नेसरीची लढाई: 1674=1+6+7+4=18=1+8 =9
एकोजी राजांचा पराभव: 1677 =1+6+7+7=21=2+1=3

हेही वाचा:
शक्तिशाली मास्टर नंबर्स
मी: सर माफ करा पटत नाही, हे 28-2-1630 ह्या तारखेला बेरीज 10=1 व 22 येते. मूळ सिद्धंत चुकिचा ठरतो.
मी: जन्मांक (Birth Number) =1 व भाग्यांक (Life Path Number)=22, 28-2-1630 रोजीही येतात.
अंकशास्त्री: Yeu det kii mag. There are many other factors.
अंकशास्त्री: You have to study all thw basics of numerology before opposing it.
मी: Sorry. U felt it bad. I was just asking query.
अंकशास्त्री: That is not query because you did not asked it as a knowledge seeker.
 अंकशास्त्री:Doubts should be asked only at the end, not at start point. And you gave your conclusion that it is false.A true seeker will think why there is too much repeatation of the specific numbers. Without considering it you concluded.
नंतर एकमेकांना शिव्या देण्याचा मोठा कार्यक्रम झाला. ते असो. 
पण एक फसवी व्यापारी वृत्ती असते त्यात तो व्यापारी/माल-विक्या आंब्याची पेटी विकत असतो, पेटीच्या वरच्या भागात चार आंबे ठेवलेले असतात व खाली पेंढा भरलेला असतो. पण वर बसवलेले चार आंबेच जेव्हा नासके निघतात तेव्हा कोण मूर्ख यांची पेटी घ्यायला जाईल? पण आपल्याकडे लोक आयुष्याला इतके वैतागले आहेत कि ते खरेच काहीही विचार न करता अशा लोकांकडे जातात. आणि स्वतःची फसवणूक करून घेतात. 
ह्या अंकशास्त्रींनी जी तारीख दिली ती मी एमएस एक्सेलमध्ये टाकली गणित तयार केले तर ह्याच तारखेशी जुळणाऱ्या असंख्य तारखा मला मिळाल्या. इतकेच काय १९ फेब्रु १६३० ची सर्वात जवळची तारीख २८ फ्रेब्रू १६३० ही सापडली. मग ह्या प्रत्येक तारखेला शिवाजी का जन्माला आले नाहीत? आकाशातील ग्रह स्थिती तर १९ आणि २८ ला फारशी बदलत नाही. 
आणि पुढची गम्मत बघा अंकशास्त्री जे म्हणतात ना कि तुमचा अभ्यास कच्चा आहे, त्यांनी पुढच्या तारखा ज्या दिल्यात त्या मोठ्या गमतीशीर आहेत. जावळी जिंकली 15 (6) जानेवारी (1), 1656 (9) रायगड किल्ला जिंकला: 6 एप्रिल 1656 (9), अफजलखानाची भेट व त्याचा वध: 10 (1) नोव्हेंबर 1659 (3), सुरतेवर स्वारी: 6 जानेवारी (1) 1664, ह्या तारखा अंक शास्त्रींना कुठून मिळाल्या हे माहित नाही. कारण शिवजन्माच्या तारखेचाच वाद बरेच दिवस चालू होता. पण वरील तारखांवर नमूद केलेल्या घटना ह्या एकाच दिवसात घडणाऱ्या घटना नाहीत. सुरतेच लुट म्हणजे शिवाजी व त्यांचे सैन्य गेले सकाळी १० वाजता व सगळी लुट करून दुपारी ४ वाजेपर्यंत परत आले असे होणे अशक्य आहे. तिथे लुट केलेल्या संपत्तीने अखंड स्वराज्य सावरले गेले. जावळी म्हणजे ट्रेकिंगचा एक डोंगर नाही कि तो एका दिवसात तुम्ही सर करताय. त्या काळात  जावळी सर करणे म्हणजे नक्कीच एका दिवसाचे काम नव्हते. 
असो तर मूळ मुद्दा हा आहे कि असे हे अंकशास्त्री अश्या प्रकारचे ज्ञान आणि गैरसमज समाजात पसरवून काय साधतात? काही नाही फक्त आपल्या पोटाची व्यवस्था करतात. जो खरा अडचणीत असतो तो बिचारा तसाच मरतो. तुम्ही जेव्हा ज्ञानाची उपासना करता तेव्हा भलेही इकडचे तिकडचे उचला. त्यात काही वाईट नाही. पण आधी ते पडताळून तरी पहा कि खरेच हे बरोबर आहे कि झूट? नाहीतर आंब्याच्या पेटीचे उदाहरण तर आहेच

Saturday, 14 November 2015

पुस्तकविक्री आणि जातीय विभागणी

जसा एकेकाळी पौरीहीत्य हा नावाजलेला व्यवसाय होता तसा आता पुस्तके लिहिणे आणि विकणे हा व्यवसाय झालेला आहे. पुस्तकांचे वेड सुमारे २०० वर्षात आपल्या समाजाला लावले गेले. पूर्वी पुस्तकातून ज्ञान येत नव्हते, ते मुखोद्गत असे. जे लहानपणी किवा दिवस रात्र आपण पाठ करतो ते आपल्या मनावर इतके चिकटते कि झोपेतही आपण ते सांगू शकतो. जे शिकायचे वय असते तेव्हाच हे शिकले जाते. नंतर पुस्तकांची मदत घ्यावी लागते. 
force = mass x acceleration, 
energy = mass x (velocity of light) square.
DNA variations = time of existence. 
Natural frequency = root(mass/stiffness)
ज्या घरात आपण राहतो ते घर भूकंपात तग धरू शकते का? हा सिद्धांत आपले घर कसे हादरते व कसे पडते  ह्याला कारणीभूत आहे. उंच टोलेजंग इमारती गुजरातेत बांधल्या आणि त्या भूजच्या भूकंपात पडल्या व असंख्य लोकांना गारद केले गेले, नेपाळमध्ये तेच झाले. आधीही भूकंप होत होते. पण चोरांची घरे दुमजली होती आणि सामान्य लोकांची घरे एकमजली होती. तेव्हा मेले ते चोर मेले. सामान्य मेले नाहीत, कारण त्यांची घरे कुडाची, आणि लाकडाची होती. लातूर, भूज ह्या भूकंपानंतर तिथे मी स्वतः काम केले आहे आणि डोळ्याने बघितले आहे कि परमेश्वराची काठी कशी चालते, तिचा आवाजही येत नाही. मोठमोठे इमले, वाडे आणि बंगले  कोसळले तेव्हा सामान्य लोक तिथे आमच्या आधी येउन त्यांचे लुटलेले सोने शोधून शोधून घेऊन जात होते.
असे अनेक आधुनिक सिद्धांत आम्ही शिकलो आहोत. भूकंपात मरणारे  पापी आणि पुण्यवान वेगळे कसे हे प्रत्यक्ष तुम्ही डोळ्यांनी पाहता तेव्हाच तुम्हाला ते कळू शकते. समस्त मानव दुसऱ्या जीवाला लुटताना कसलाच विधीनिषेध पाळत नाही. त्यात तो आपल्या जगण्याच्या लढ्यात सृष्टीला सुद्धा सोडत नाही. 
नंतर पश्चात्ताप करण्यात काही अर्थ नाही. 
आपण आता मूळ विषयाकडे  वळूया 
सध्या पुस्तकविक्री जोरात करण्यासाठी लोकांनी २ सिद्धांत  बनवले आहेत, ते असे,
१) सवर्ण हे वैदिक आणि बहुजन हे अवैदिक,
२) आर्य हे देव आणि अनार्य हे असुर. 
हे दोन्हीही सिद्धांत कसे फोल आहेत हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल, 
ज्योतिष्य शास्त्रानुसार मानवाचे खालील चार प्रकार बनतात,
सवर्ण म्हणजे ब्राम्हण, आपल्या प्रथा जपणारे कट्टरवादी, त्यांची सहनशक्ती अतिशय अल्प असते, हा त्यांचा दुर्गुण. जेव्हा विश्वामित्राने कर्णाला शाप दिला तेव्हा त्याने हेच सांगितले होते. त्यांची संख्या समाजात आज किती राहिली आहे तर फारफार ३ %. 
त्यानंतर क्षत्रिय वर्णाचा नंबर लागतो, तो थोडा संयमी आहे पण तोही फार सहनशक्ती बाळगत नाही. आपल्या देशात  बंडाळी करणाऱ्या लोकांचा इतिहास तपासला तर त्यांची सहनशक्ती कशी संपली हे वाचकांना नक्कीच लक्षात येईल. 
वैश्य हे तिसरे जातिवंत सहनशील पण  संधी साधून आपला माल विकून मोकळे होतात. 
शुद्र हे पिढीजात सहनशील, त्यांना कसेही रेटा, हाणा, मारा पण ते  सेवाच करत राहणार. 
म्हणजे ह्यातील ब्राम्हण, अर्धे साधन क्षत्रिय, ह्यान्ना सोडून बाकी राहिलेले लोक ह्यांना बहुजन आणि असुर (राक्षस) म्हणायचे. कारण ह्यांची संख्या समाजात ९७% आहे, त्यांची सहानुभूती मिळवून आपली पुस्तके विकायची असल्या घाणेरड्या युक्त्या हे लोक करतात. शिवाय ह्यांच्या विचारात काही तथ्य आहे का हे शोधण्यासाठी राहिलेले ३% ह्यांची पुस्तके वाचतात असा हा १००% ग्राहक गळाला लावायचा धंदा लोक करत आहेत. 
एकवेळ निरीश्वरवादी परवडले पण आपले आत्मघातकी लांडगे किती घाणेरडी कामे करतात ते पहा,
आपलेच काही लोक वैदिक अवैदिक वाद उकरून काढतात, देव-असुर वाद असे माहित नसलेले विषय काढून लिखाण करतात. हे लोक नरकासुर, टिपू सुलतान आणि पेरीस हल्ला हा गरम विषय असल्याने हिरहिरीने त्यावार लिहित आहेत. 
पुढे हेच लोक टिपू सुलतानाची पाठराखण करीत आहेत, हीही त्यांना  काहीच गरज नव्हती. पण आपण अति हुशार असे समजून काहीतरी लिहायचे, त्याचा सर्वांनी शक्य त्या प्रकारे निषेध करावा. टिपू सुलतान हा अतिशय क्रूर, कपटी, हिंदूद्वेष्टा राज्यकर्ता होता हे सुर्याइतके स्पष्ट आहे त्यामुळे त्याची पाठराखण करणे म्हणजे इसीस, तालिबान ह्यांची पाठराखण करण्यासारखे होईल.  
हे कमी झाले म्हणून हे लोक पेरीस मध्ये झालेल्या हल्ल्याला हिंदूंना दोष देत आहेत. ते अमेरिकेला देतच आहे, पण ते त्यानच्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत, जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा भारतात परकीयांचे अनन्वित अत्याचार चालू होते. त्यावेळी जे अतिरेकी काम चालले होते त्याला अमेरिका कारणीभूत होती का? इस्लाम्वाद्यांनी हिंदुस्तान वर आक्रमण करून हजारो वर्षे लुट केली त्याला बायबलचा पहिला करार, पलेस्ताइन इस्राईल वाद कारणीभूत आहे असे हे लोक सांगतात. आहे कि नाही हास्यास्पद. हिंदू हे करार करायला गेले होते का? मग त्यांना ह्यात ओढून का आणले जात आहे? हिंदूंनी इस्लामी आक्रमकांना इथे बोलावले नव्हते, इंग्रजांनाहि कधी आम्ही इथे बोलावले नव्हते. इथल्या मातीची सुबत्ता पाहून ते इथे आले, त्यांनी "घी बघितले पण बडगा बघितला नाही" . कुठे ह्यांचे वाद आणि कुठे हिंदुंवर झालेले अत्याचार! काहीही संबंध नाही. फक्त प्रसिद्धी लोलुप, आणि संधिसाधू वृत्तीने काहीतरी लिहायचे आणि स्वतःचे उखळ पांढरे करून घ्यायचे. जे आज दुसर्याचा घरात झाले आहे ते पूर्वी अपल्या घरात झालेले होते, व पुढे होणार आहे याचा विचार न करता हे लोक इसीस तालिबान आणि तत्सम दहशतवादी संघटनांची वकिली करताहेत. टिपू सुलतानला महान ठरवत आहेत, अशा लोकांचा जाहीर धिक्कार!!
 

Thursday, 5 November 2015

जातीसंस्थाविरोधी ज्योतिषशास्त्र

जातीसंस्था शब्दाचा अर्थ जन्माधारित जातीसंस्था असाच आहे, हे मी आधीच सांगून लेखाची सुरुवात करतोय.
बरेच विद्वान ऋग्वेदाचे अर्थ/अन्वयार्थ काढून हिरहिरीने वैदिक लोक हे जन्माधारित वर्णव्यवस्थेचे कारक आहेत हे सांगत असतात. हे सगळे विद्वान एकतर पाश्चिमात्य इतिहास संशोधक किवा डॉ. आंबेडकरांचे साहित्य वापरून सगळे दाखले देत असतात. स्वतःचे असे त्यांचे काहीच नाही हे अगदी स्पष्ट होते. क्षत्रिय शब्द हा खेतीय/खतिय ह्या प्राकृत शब्दावरून आला हे वाचून हसू आल्याशिवाय राहत नाही. अर्थात त्या खतीय शब्दाला काहीच अर्थ नाही, उलट क्षत्रिय शब्दाला क्षत: त्रायते इति क्षत्रिय हि साधी बाळबोध उत्पती आहे, पण त्यात खेत आणि खेती आली कुठून? उलट जे क्षत्रिय होते त्यांना शेती दिली गेली हे वास्तव आहे. क्षत्रिय वर्णाशिवाय कुठलाही समाज हा पंगु आहे, इतकेच काय गुनाधारित वर्ण आणि कर्म विभाजनाशिवाय समाज प्रगती आणि स्वरक्षण करू शकत नाही. साधी गोगलगायसुद्धा संकटकाळात पोटात पाय घालून घेते. आधी शेती करणारा हिंदू समाज ह्या गोगल गाइपेक्षा स्वरक्षणासाठी अधिक पंगु होता. मध्ययुगात इस ७०० ते १७०० ह्याकाळातही आपला समाज पंगूच होता हे इतिहास वाचून सिद्ध होते. असे का त्याची मुलभुत कारणे ह्यांचा विचार आपण करूया,
१) शेती उघड्या जमिनीवर असल्याने युद्धप्रसंगी तिचे रक्षण करणे अवघड नव्हे अशक्य होते. 
२) शेती करणारा समाज विस्तृत प्रदेशात पसरलेला असल्याने तो विखुरला होता, सीमावर्ती भागात एकत्र होणे शेतीच्या दृष्टीने अशक्य होते. 
३) पाण्याची धरणे, नद्या अडवून शेतकऱ्यांना नाकी नऊ आणले जात होते. 
४) शेती व्यवसायात शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात नव्हते.
५) शेतिअधरित मानव हा अधिकाधिक शाकाहारी बनत चालला होता त्यामुळे हिंसा हा प्रकार शेती समाजाला निषिद्ध होता, 
अशी अनेक कारणे आहेत. 
पशुपालक मानव हा हिंसा करणारा असणार हे नक्की. नंतर हजारो शेती करण्याच्या नादात तो हिंसा विसरून गेला. इतकेच वेदपूर्व काळातील पुरावे पाहून सांगू शकतो. ऋग्वेदात सर्वात प्रथम वर्णांचा उल्लेख आढळतो. पण तो वेगळ्या शब्दांनी व्यक्त केला आहे. विशेषतः तिथे क्षत्रियाला राजन्य शब्द आलेला आहे. तसे पहिले तर राजन हा एक आदरवाचक शब्द आहे इतकेच. पण तूर्तास आपण राजन ह्या रजोगुणी म्हणून राजन्य म्हणूया. 
नंतर ऋग्वेदातच पुरुषसुक्त आलेले आहे, त्यात समाजरुपी पुरूषाचे अनुक्रमे शीर हे ब्राम्हण, हात हे क्षत्रिय, पोट हे वैश्य तर पाय हे शुद्र असे वर्णन आलेले आहे. पण ह्यात कुठेही हे चार वर्ण जन्माधारित आहेत असे म्हटलेले नाही. तर तो इतिहास्कारांचा काढीव अर्थ आहे. पुढे पुरुषसुक्त हे ऋग्वेदात नंतर घुसडले गेले असा तर्क विद्वान काढतात. ह्याचे कारण म्हणे चार वर्णांचा शब्दशः अर्थ पूर्वी ऋग्वेदात कुठेही येत नाही म्हणून. हेही आपण मान्य करूया. 
म्हणजे जन्माधारित वर्णवाद वाढवण्यासाठी पुरुषसुक्त बनवले गेले असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होतो. आता आपण थोडे पुढे जाऊ, ज्योतिष्यशास्त्र भारतीय लोकांना पूर्वी माहीतच नव्हते असे विद्वान समजतात. ते अलेक्झांडर ह्याच्या आक्रमणानंतर ग्रीकांनी भारतात आणले असे विद्वान मानतात. ज्योतिष्यशास्त्राचे जनक वराहमिहिर ह्यांचा काळ इस ५०० ते ६०० असा सांगितला जातो. म्हणजे पुरुषसुक्त समजा ह्याच काळात जरी घुसडले गेले असे मानले तरी न ज्योतिष्यशास्त्र जन्माधारित वर्णांचा पुरस्कार करते न पुरुषसुक्त. 
ज्योतिष्यशास्त्राप्रमाणे दर २ तासाच्या अंतराने जन्माला आलेल्या व्यक्तीचा वर्ण वेगळा असतो. तो सर्वस्वी आकाशातील ग्रह तारे व नक्षत्र ह्यांच्यातील चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून असतो. म्हणजे ज्योतिष्य शास्त्र जन्माधारित वर्ण व्यवस्थेला मोठा सुरुंग लावणारे आहे. तसेच पुरुषसुक्त फक्त एका सर्वांग आणि मजबूत समाज संस्थेचे वर्णनमात्र आहे.

आता विचार करा कि ह्या समाजात सर्वात वरचे स्थान प्राप्त झालेल्या ब्राम्हणांना पुरुषसुक्त आणि ज्योतिष्य ह्यांचा उदो उदो करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा होता का? पण तरीही त्यांनी तो मूर्खपणा केलाच. इतकेच नव्हे तर बरेच ज्ञान शोधणारे आपले पूर्वज हे नुसते ब्राम्हण नव्हते. तेसुद्धा त्याकाळातील पुरोगामी होते. बहुजनांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या पुरातन जन्माधारित प्रथा चालूच ठेवल्या. शेवटी पुरुषसुक्त आणि ज्योतिष्य सांगणारे हारले आणि नाईलाजास्तव त्यांनीही जन्माधारित जाती-वर्ण ह्यांना होकार दिला, अजूनही आपल्या समाजात गुनाधारित कर्म व्यवस्था येत नाही तोवर आपला समाज पंगूच राहणार आहे. बाकी सगळ्या वल्गना आहेत.