बागेतील फुले जशी रंगबेरंगी आणि सुंदर असतात तसेच आकाशातील ग्रह हे रंगबेरंगी व सुंदर असतात. गुलाबासारखे काटे-कोरंटीला हाताने कुस्करता येत नाही तसेच हे आपले मित्र ग्रह आहेत. फरक इतकाच की फुले बघायला आपल्याला वेळ नसतो आणि ग्रह इतके दूर आहेत की ते बघायला आपल्याला इतकी लांबची दृष्टी नाही.
काही ग्रह एकमेकांना पाण्यात पाहतात त्यातली शुक्र मंगळ ही जोडी आहे. सगळ्यात आधी शुक्र आणि मंगळ हे कशाचे कारक ग्रह आहेत हे आपण पाहू.
शुक्र: शुक्र ग्रह हा नाजूकपणा, सौंदर्य, कलागुण, कवित्व, हळवेपणा ह्यांचा कारक आहे. कारक म्हणजे वरील गुण शुक्राच्या कृपेने प्राप्त होतात. शुक्र १,२,४,५,७,९,१०,११ आणि १२ ह्या सर्व स्थानात अनुकूल असतो, शुक्र हा एक शुभ ग्रह आहे. तो चांगल्या गोष्टी घडवतो. फक्त ३,६,८ ह्या स्थानात शुक्र अशुभ समजला जातो. शुक्र म्हणजे शुभ्र पांढरा रंग आहे. लग्नी शुक्र असणारे लोक हमखास गोरे असतात. अर्थात शुक्राबरोबर मंगळ असल्यावर असे होत नाही.
त्याचे रत्न हे हिरा (किंवा पर्यायी रत्न झिरकॉन) हे आहे. शुक्र हा स्त्रीतत्त्वाचा ग्रह आहे.
गम्मत म्हणजे पुरुषत्वाला किंवा पुरुषाच्या वीर्यातील कणांना शुक्रजंतू (sperm) म्हणतात. (त्यांना जंतू म्हणतात हे एक दुर्दैव आहेच आहे) पण स्त्रीवाचक ग्रहाचे नाव मात्र पुरुषातील प्रजनन करणाऱ्या कणांना दिले जाते हे आश्चर्यकारक वाटते.
शुक्र जरी स्त्रीवाचक असला तरी त्याचे गुण असलेले पुरुष स्त्रियांना आवडतात, त्यांना भुरळ घालतात म्हणून शुक्र प्रभावी असणारे लोक प्रेम, प्रणय ह्यात अधिक यशस्वी होतात. शुक्रजंतू अमाप असूनही ते योग्य ठिकाणी म्हणजे स्त्रीबीजापर्यंत पोचलेच नाहीत तर पुढची पिढी कशी निर्माण होणार? शुक्रजंतू प्रभावी असणे हे पुरुषत्वाचे महत्व आहे म्हणून ते शुक्राचे महत्व आहे. शुक्र हा शांतताप्रिय ग्रह आहे. तो स्त्रीच्या कलाकलाने घेणारा आहे. तो जोर-जबरदस्ती करीत नाही. वृषभ आणि तूळ राशीचा शुक्र हा स्वगृही व बलवान असतो, मीन ह्या बाराव्या राशीचा शुक्र उच्चीचा असतो. कन्या राशीचा शुक्र हा निचीचा असतो. (कन्या ही बुधाची रास शुक्रालाही आवडत नाही).
तरीही बुध, राहू, शनी हे शुक्राचे मित्र आहेत हे विशेष. त्यातील शनीशी शुक्राचे सख्य म्हणजे शनीचा मंदपणा, अंधार (सामान्यतः स्त्रीला लज्जा ह्या कारणास्तव प्रणयाचे वेळी अंधार आवडतो), न्यायवृत्ती ह्यांच्याशी निगडित आहे.
शुक्राची स्वगृह तूळ रास ही शनीची उच्च रास आहे. आता मंगळ ह्या महाभागाचा विचार करूयात,
मंगळ: मंगळ म्हणजे पवित्र हा कशा अर्थाने हे शेवटी पाहू, पण मंगळाचे गुण आधी पाहुयात, मंगळ म्हणजे, राऊडी, धसमुसळा, घाईवर आलेला, अधीर, पिच्छा न सोडणारा, शीघ्र, तापट, शीघ्रकोपी, अपमान सहन न करणारा, स्वतःच्या हक्कासाठी दोन हात करणारा, संयम नसलेला, अंगात घुमणारा, पछाडून टाकणारा, न्याय्य अन्याय्य ह्यापेक्षा समोर काय योग्य वाटते ते बघून लढणारा लढवैय्या.
मंगळ ३,६,१० आणि ११ ह्या घरात अनुकूल असतो, मंगळ हा एक पापग्रह आहे. तो युद्धखोर आहे. त्याचा रंग लाल आहे. हा रक्ताचा ग्रह आहे. स्त्रीबीज हे रक्तातून बनते आणि त्याची वाढ रक्तातून होते म्हणून स्त्रीच्या दृष्टीने मंगळाचे महत्व अधिक आहे. मंगळाचे हेही गणित शुक्रासारखेच अगदी विरुद्ध आहे, कारण मंगळ हा पुरुष ग्रह आहे तरीही तो स्त्रीतत्वाच्या अधिक जवळचा आहे. कारण निसर्गतः स्त्रीला पाळी येणे, बाळंतपण ह्यात जे रक्त खर्ची घालावे लागते ते पुरुषाला घालावे लागत नाही. रक्ताची ओळख स्त्रीलाच आधी होते. ज्यावेळी पुरुषांच्यात जबर स्पर्धा असते तेव्हा त्यातील यशस्वी पुरुषालाच स्त्री निवडते, हे उत्क्रांतीचे तत्व मंगळी लोकांच्या बाबत लागू पडते.
शुक्राची प्रेमप्रकरणात महती, आणि स्पर्धेत मंगळाची महती हे दोन अगदी वेगवेगळ्या स्थित्या दर्शवितात. हे दोन ग्रह प्रबळ असलेले लोक आपापल्या आवडीप्रमाणे (प्रबळ ग्रहाप्रमाणे) जोडीदाराची निवड करतात. त्यात त्यांची पत्रिका म्हणजेच सर्वांगीण पार्श्वभूमी कारणीभूत असते. कारण एका कष्ट करणाऱ्या घरातील मुलगा मुली कशा जोडीदाराची निवड करतात हे त्यांच्या आयुष्यावर अवलांबून असते. अर्थात तो पूर्ण वेगळा आणि मोठा विषय आहे म्हणून त्यावर इतरत्र चर्चा करूयात.
शुक्राची प्रेमप्रकरणात महती, आणि स्पर्धेत मंगळाची महती हे दोन अगदी वेगवेगळ्या स्थित्या दर्शवितात. हे दोन ग्रह प्रबळ असलेले लोक आपापल्या आवडीप्रमाणे (प्रबळ ग्रहाप्रमाणे) जोडीदाराची निवड करतात. त्यात त्यांची पत्रिका म्हणजेच सर्वांगीण पार्श्वभूमी कारणीभूत असते. कारण एका कष्ट करणाऱ्या घरातील मुलगा मुली कशा जोडीदाराची निवड करतात हे त्यांच्या आयुष्यावर अवलांबून असते. अर्थात तो पूर्ण वेगळा आणि मोठा विषय आहे म्हणून त्यावर इतरत्र चर्चा करूयात.
मंगळ ग्रह भोळा आहे, त्याचा राग हा त्याच्या तात्कालिक हक्कांची अवहेलना झाल्याने उत्पन्न होतो. तो भोळेपणाने लढणारा वीर आहे. त्याला कसलीच पर्वा नसते. तो अगदी बेपर्वा असतो. बेभान. तो क्षणभर जगतो पण जगुण जातो, मोठ्या ऐटीत.
आता हा अन्योन्य क्रम बघा, मंगळ स्त्रीच्या बाजूचा, आणि शुक्र पुरुषाच्या बाजूचा, पण हे ग्रह अगदी विरुद्ध वागतात. मंगळ जोरजबरदस्ती करणारा आणि शुक्र गोड-गोड बोलून काम साधून घेणारा, (मला तर ह्या शुक्राचा राग येतोय).
बलात्कार हा आजकाल मोठा ऐरणीवरचा मुद्दा आहे, शुक्र आणि मंगळ ह्या दोन ग्रहांचा एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक शक्तीशी जवळचा संबंध असल्याने फसवून विवाह करणे, बलात्कार करणे, मर्जीविरुद्ध विवाह करणे यांचा या दोन ग्रहांशी संबंध आहे. तो आपण पुढे पाहूयात.
मंगळाचा एक चांगला गुण म्हणजे मंगळ चांगला असलेल्या व्यक्ती ह्या भरपूर उर्जा असलेल्या असतात, स्वस्थ बसत नाहीत, दिर्घोद्योगी असतात. त्यामुळे त्या सतत बदल घडवत असतात. लक्ष्मी अर्थात संपत्ती त्यांच्यामागे येते. म्हणून मंगळाला मंगळ म्हणजे शुभ मानले गेले आहे.
तूर्तास इतकेच...
मंगळाचा एक चांगला गुण म्हणजे मंगळ चांगला असलेल्या व्यक्ती ह्या भरपूर उर्जा असलेल्या असतात, स्वस्थ बसत नाहीत, दिर्घोद्योगी असतात. त्यामुळे त्या सतत बदल घडवत असतात. लक्ष्मी अर्थात संपत्ती त्यांच्यामागे येते. म्हणून मंगळाला मंगळ म्हणजे शुभ मानले गेले आहे.
तूर्तास इतकेच...
No comments:
Post a Comment