Thursday, 10 September 2026

डीजे ढोल आणि गणेशोत्सव विरोध

पिढ्यानपिढ्यांची सुबत्ता: पौरोहित्य आणि पूजापाठ करून ज्यांच्या अनेक पिढ्या सुबत्तेत जगल्या, त्यांना देवाची गरज असणार कुठून?  दुसरीकडे, सर्वसामान्य बहुजन समाज आत्ता कुठे शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या संधी मिळाल्याने स्वतःच्या कष्टावर उभा राहत आहे. वर्षाचे ३६५ दिवस प्रामाणिक कष्ट केल्यानंतर जेव्हा त्याला यश मिळते, तेव्हा परमेश्वरावर आणि स्वतःच्या मेहनतीवर असणारी त्याची श्रद्धा अधिक दृढ होते. ज्यांना कष्टाशिवाय सहजासहजी सर्वकाही मिळत गेले, त्यांनाच सण-उत्सव आणि श्रद्धेचा त्रास होतो. 

ढोल-ताशे आणि डीजे या दोन्ही गोष्टी सण-उत्सवांचा आनंद वाढवण्यासाठी आवश्यक आहेत. आवाजाची मर्यादा आणि वेळेची बंधने राखून या दोन्ही गोष्टींचा वापर होणे पूर्णपणे योग्य आहे. ढोल-ताशा पथकांमागे इथल्या तरुण मुलांची अफाट मेहनत असते; १००-२०० मुलांची टीम महिने न् महिने रात्रीचा दिवस करून सराव करते. पण ज्यांना असा कठोर सराव करणे शक्य नाही त्यासाठी पैसे संघटन निर्माण करणे शक्य नाही , त्यांनाही आपला सणाचा उत्साह साजरा करण्याचा पूर्ण अधिकार आहेत्यांच्यासाठी डीजे हे एक उत्तम माध्यम ठरते. त्यामुळे प्रशासनाने वेळेचे आणि आवाजाच्या तीव्रतेचे नियम नक्कीच घालावेत; परंतु डीजे किंवा ढोल-ताशांवर पूर्ण बंदी घालण्याची अथवा ते बंद पाडण्याची भाषा करणे पूर्णपणे चुकीचे आहे!

पहिली गोष्ट स्पष्ट: आम्ही आवाजाची डेसिबल मर्यादा आणि वेळेची बंधने पाळण्यास पूर्णपणे तयार आहोत. प्रशासनाने घातलेले नियम, मर्यादित वेळ आणि ध्वनीची मर्यादा याला आमचा कोणताही विरोध नाही. 

मग यावर लिहायचे कारण काय ? जेव्हा वेळेच्या आणि नियमांच्या नावाखाली थेट संस्कृती, उत्सव, तरुणांचा आनंद, सामाजिक संघटन आणि लोकांच्या श्रद्धेवरच विषारी टीका केली जाते. 'देवांना गावाबाहेर घालवा', 'उत्सवांनी देशाचे नुकसान होते' किंवा 'लोकांचा वेळ वाया जातो' अशा हेटाळणीयुक्त भूमिकेला आमचा थेट विरोध आहे.

 डीजे-चापट "आम्ही अमेरिका किंवा पाश्चात्य देशांतील शांतता आणि शिस्तीची तुलना करतोय, त्यात गैर काय?" 

१. H-1B व्हिसा दुर्लभ झाल्याची पोटदुखी :  इथल्या वातावरणाला नावे ठेवून कायम अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची खरी अडचण H-1B व्हिसाची प्रचंड फी परवडत नाही ही आहे. तिकडे जाता येत नाही आणि इकडे राहावे लागते, या नैराश्यातून ही बडबड सुरू आहे.

व्हिसा मिळत नाही किंवा परदेशात जाता येत नाही म्हणून इथल्या स्थानिक संस्कृतीवर, गर्दीवर आणि सणांवर आपला राग काढणे हा निव्वळ वैयक्तिक नैराश्यातून आलेला आकस आहे. मनोरुग्ण अ सल्यासारखे बोलायची लक्षणे बघा. मी निशस्त्र होतो, मॅगझीन असती तर..  माझ्याकडे शस्त्रं किंवा मॅगझीन असती तर..." अशा बाता मारण्यामागे याची  सद्यमानसिकता स्पष्ट दिसते. अमेरिकेचा आणि तिथल्या व्हिसाचा अति-हव्यास डोक्यात इतका भिनला आहे की, त्या वेडाचा थेट परिणाम यांच्या मानसिकतेवर झालेला दिसतो.

 पूर्वी मंदिरात गर्दी वाढल्यामुळे ज्यांचे खिसे भरत होते, तेच आज देवालाच गावाबाहेर हाकलण्याच्या बाता मारत आहेत. कारण देव हा यांच्यासाठी कधीही खऱ्या श्रद्धेचा विषय नव्हताच, तो फक्त आणि फक्त स्वतःचे 'पोट भरण्याचे एक साधन' होता.

  डीजे-चापट: "सार्वजनिक ठिकाणी गर्दी आणि अडथळे निर्माण होतात, म्हणून देवाला आणि उत्सवांना शहराबाहेर न्यायला हवे." हे जो कोणी म्हणत आहे तोच पूर्वी गल्लीबोळात मंदिरे मांडून दक्षिणेच्या पेटीवर लक्ष ठेऊन बसत होता. 

४. ऋग्वेदातील 'देवी सूक्त' (१०.१२५) मध्ये देवीला सर्वोच्च मानले गेले आहे. तरीही लोकांच्या श्रद्धेचा आणि देवाचा 'बाजार' मांडून सामान्य जनतेला फसवण्यासाठी मूळ वेदांतील देवीची श्रेष्ठता बाजूला ठेवून, नवनवीन देव-देवता आणि कर्मकांडांचे अवडंबर माजवले गेले. म्हणून  आज ३३ कोटी देवता आणि त्यांचे ३६५ दिवस उत्सव आपल्या बोकांडी कोणी मारले? गणेशाची माता हि बहुजनांची आद्यदेवता आहे. 

  डीजे-चापट: "उत्सवांच्या नावाखाली भक्तीचा आत्मा बाजूला पडून फक्त गाड्यांचे ताफे, गोंधळ आणि देवांचा बाजार मांडला जातोय."

उत्तर: भक्ती ही सोवळ्या-ओवळ्यात किंवा ठराविक कर्मकांडात अडकलेली नसते. तरुण मंडळी डीजे, गाड्यांचे ताफे किंवा मिरवणुकीतून जो उत्साह दाखवतात, ती त्यांची भक्ती आणि आनंद व्यक्त करण्याची भक्तीच आहे .इस्कॉनवाले ढोल कुटून वेड्यासारखे अमेरिकेत नाचतात त्यांच्याबद्दल हा बहाद्दूर का बोलत नाही. 

 ५. कष्टकरी वस्त्यांबद्दलचा जातीयवादी व वर्गीय अहंकारपुण्यातील मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि बहुजन कष्टकऱ्यांच्या वस्त्या किंवा लोक "गोंगाट करतात" म्हणून त्यांना आपल्या परिसरापासून दूर ठेवण्याची भाषा करणे, ही जुनाट संकुचित मानसिकतेचे लक्षण आहे. स्वतःचा वर्ग सोडून बाकी सर्व कष्टकरी समाज यांच्यासाठी अजूनही 'दुय्यम' किंवा 'शूद्र'च आहे.

 डीजे-चापट: "हा फक्त नागरी समस्यांचा आणि रहिवाशांच्या शांततेचा विषय आहे, याला जातीय किंवा वर्गीय संघर्षाचा रंग का देता?"

 उत्तर: महाराष्ट्रात आरक्षण, उपवर्गीकरण आणि प्रतिनिधित्वाचा लढा आरक्षण बंद करा इत्यादी हा अत्यंत जिवंत  प्रश्न आहे. बहुजन व कष्टकरी समाजाच्या सांस्कृतिक अभिव्यक्तींवर होणारी टीका ही त्यांच्या ऐतिहासिक व सामाजिक स्थानाशी थेट जोडलेली आहे. त्यामुळे या मुद्द्याला जातीय व वर्गीय संदर्भ असणे हे उघड सामाजिक वास्तव आहे.

६. 'नवब्राह्मणवाद  अशा विचारांच्या लोकांची तळी उचलणाऱ्यांनी जरा स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही स्वतःला 'नवब्राह्मण' समजून कितीही समर्थन केले, तरी हे लोक तुम्हाला कधीही आपल्या बरोबरीचे मानणार नाहीत. डीजे ढोल वाजवणारे इतकी वर्षे कोणाच्या तालावर नाचत होते? 

  डीजे-चापट: "आम्ही कोणत्याही वर्गाचे समर्थन करत नाही, आम्ही फक्त पुरोगामी आणि विवेकवादी भूमिकेतून मत मांडतोय."

उत्तर: बहुजन समाजाच्या उत्सवांवर आणि आनंदावर टीका करणाऱ्या उच्चभ्रूंच्या बाजूने उभे राहून स्वतःला 'विचारवंत' समजणे हा भ्रम आहे. जे याला पाठबळ देत आहेत त्यांना जातीच्या दाखल्यावर "उच्चवर्णीय म्हणून शिक्का मिळणार नाही. 

७. अरुंद रस्ते, लोकप्रतिनिधींचे अपयश आणि ३०० वर्षांपूर्वीची  मानसिकता: रस्त्यावर मांडव का येतात, आवाज घराच्या जवळ का वाजतो ? पिंपरी-चिंचवडमध्ये जर मोठे आणि प्रशस्त रस्ते होऊ शकतात, तर पुण्यातल्या पेठांमध्ये रस्ते आजही बोळकांड्यांसारखे अरुंद का राहिले? पुण्यातल्या या भागांतून आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी निवडून आले, त्यांनी २०० वर्षापूर्वीच्या काळातील 'अरुंद रस्ते संस्कृती' तशीच जपून ठेवली.

 डीजे-चापट: "रस्ते आधीच अरुंद आहेत, त्यामुळे अशा ठिकाणी उत्सव साजरे करून वाहतूक कोंडी करणे चुकीचे आहे."

 उत्तर: वर्षांनुवर्षे ज्या लोकप्रतिनिधींनी शहराचा विकास केला नाही ते राजकीय नेतृतच तुम्हीच तथाकथित उच्च लोक निवडून देत होतात आणि देत आहेत. 

८. पुण्याची खरी प्रगती  हि फक्त आयटी व तत्सम लोकांनी निर्माण केलेली नाही. आज पुणे हे काही केवळ एका विशिष्ट वर्गाचे शहर नाही. आसपासचा ग्रामीण भाग, इथे व्यापार-व्यवसाय करणारा बहुजन समाज आणि कष्टकरी लोकांमुळेच शहराला आजचे मोठेपण मिळाले आहे. 

 डीजे-चापट: "उत्सवांमुळे शहराचे आर्थिक नुकसान होते आणि कामकाज ठप्प होते."

 उत्तर: सार्वजनिक सोहळ्यांमुळे लहान व्यावसायिक, कष्टकरी, वादक, कलावंत आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला अब्जावधी रुपयांची चालना मिळते. उत्सवांना आर्थिक नुकसानाचे कारण मानणे हा प्रत्यक्ष आर्थिक वास्तवापासून पूर्णपणे तोडलेला युक्तिवाद आहे.

९. मराठा पराक्रम, मराठ्यांनी रणांगणावर स्वतःचे रक्त सांडून या भूमीचे आणि धर्माचे रक्षण केले नसते, तर आज परिस्थिती वेगळी असती. ज्या ढोल-ताशांच्या तालाला उगीच 'गोंधळ' म्हणून हिणवले जात आहे, ते ढोल-ताशे पूर्वजांच्या बलिदानाचे प्रतीक आहेत.

 डीजे-चापट: "आजच्या काळात ऐतिहासिक शौर्याचा संदर्भ देऊन गोंधळाचे समर्थन कसे होऊ शकते?"

उत्तर: पूर्वजांचा इतिहास हा केवळ पुस्तकांत वाचण्यासाठी नसून तो प्रेरणेचा जिवंत स्रोत आहे. १००-२०० मुले शिस्तीत एकत्र येऊन ढोल-ताशा वादनाचा महिने न् महिने रात्रीचा दिवस करून सराव करतात, ती त्यांच्या ऐतिहासिक अस्मितेची आणि परंपरेची जोपासना आहे. इतिहास हा जगण्याचे साधन असतो. 

१०. धर्माचे रक्षण: या भूमीतील संस्कृती आणि धर्माच्या रक्षणामुळेच आज मोकळा श्वास घेता आला, शिक्षण घेता आले आणि धर्मपरिवर्तन न होता संस्कृतचे शब्द वापरून बाता मारता आल्या. शेजारच्या पाकिस्तानची परिस्थिती बघा, म्हणजे काय गमावले असते याची किंमत कळेल.

 डीजे-चापट: "आधुनिक आणि प्रगत युगात धर्माचा आणि परंपरांचा अति-अट्टाहास कशाला पाहिजे?"

उत्तर: जी संस्कृती टिकली म्हणूनच आज आपल्याला लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे. आपल्या मुळांना आणि परंपरांना विसरून स्वतःच्याच संस्कृतीला हिणवणे ही निव्वळ कृतघ्नता ठरेल.

११. पाश्चात्य तुलना  इथल्या स्थानिक वातावरणाची तुलना परदेशी निकषांशी करत बसणे अयोग्य आहे. आपल्या सण-उत्सवांचा स्वतःचा एक वेगळा जीवनप्रवाह आणि इतिहास आहे.

 डीजे-चापट: "परदेशात नियमांचे तंतोतंत पालन होते आणि लोक शांततेत राहतात, मग इथेच असा जल्लोष का?"

 उत्तर: युरोप आणि उत्तर ध्रुवाकडील देशांमध्ये उन्हाळ्यात लोक हवामानाचा आनंद घेण्यासाठी महिना-दोन महिने सुट्ट्या घेऊन पूर्णपणे एन्जॉय करतात आणि तिथली सरकारे त्याला अधिकृत मान्यता देतात. मग भारतात वर्षभरातील फक्त १० दिवस लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करत असतील, तर त्याला 'वेळ वाया घालवणे' म्हणून पोटदुखी होण्याचे काहीच कारण नाही.

१२. अस्वस्थ मानसिकता  मन शांत आणि कामात एकाग्र असेल तर बाहेरचा थोडा वेळ होणारा उत्साह त्रास देत नाही. रिकामा मानसिक त्रस्त माणूस बहाणे शोधात असतो.  इतकाच त्रास असेल तर थेट सरकारकडे जाऊन 'लोकांच्या संचार स्वातंत्र्यावर बंदी आणा' अशी मागणी करून पाहावी! महाराष्ट्रात बाहेरची गर्दी ट्राफिक कमी होईल. 

 डीजे-चापट: "बाहेरच्या गोंधळामुळे आणि गर्दीमुळे आमची एकाग्रता भंग होते आणि कामावर परिणाम होतो."

 उत्तर: आम्ही मर्यादित वेळ आणि ध्वनीची मर्यादा मानतोच. पण वर्षातील १० दिवसांच्या उत्सवाने ज्यांची एकाग्रता सुटते, त्यांची अडचण उत्सवात नसून त्यांच्या स्वतःच्या अस्वस्थ मानसिकतेत आहे. लोकशाहीत नागरिकांच्या एकत्र येण्याला गोंधळ मानणे अयोग्य आहे.

१३. हिंदू-विरोधी संधीसाधुंचे पेव:   या निमित्ताने आतापर्यंत जे लोक हिंदू देवी-देवतांवर घाणेरडी टीका करायचे, ते सगळे अर्थकारणी संधीसाधू आता बिळातून बाहेर आले आहेत आणि समर्थनाचा गोंधळ घालत आहेत.

 डीजे-चापट: "आम्ही कोणत्याही अर्थकारणी हेतूने नाही, तर केवळ सुजाण नागरिक म्हणून नागरी सुधारणांसाठी बोलतोय."

उत्तर: सुधारणेचा मुखवटा घालून फक्त हिंदू सणांच्या वेळीच आक्षेप घेणे आणि सोशल मीडियावर टोळधाड घेऊन येणे, यावरून यांचा छुपा अर्थकारणी हेतू आणि संधीसाधूपणा उघडा पडतो.

१४. तरुणांचा देश भारत हा जगात सर्वात तरुण देश (सरासरी वय २८ वर्षे, ६५% लोकसंख्या ३५ वर्षांखालील) आहे. तरुण रक्ताने सळसळणाऱ्या या देशात लोक उत्साहाने आणि आनंदानेच जगणार!

 डीजे-चापट "तरुणांनी सण-उत्सवांत वेळ न घालवता २४ तास फक्त शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन आणि रोजगारावरच लक्ष दिले पाहिजे."

 उत्तर: भारतातील तरुण वर्ग दिवस-रात्र शिक्षण, नोकरी आणि रोजगारासाठी आधीच प्रचंड धडपड करत आहे, ज्याचे फलित GDP मध्ये दिसत आहे. परंतु, माणूस हा २४ तास फक्त कामात जुंपलेला रोबोट असू शकत नाही. ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी मानवी भावना, आनंद आणि विरंगुळा तितकाच महत्त्वाचा आहे. २४ तास उपदेशाचा पाढा वाचणे अमानवी आहे.

१५. गणपती – बहुजनांचे दैवत गणपती हा मुळात सर्वसामान्य बहुजन समाजाची बुद्धीची व प्रेरणेची मुख्य देवता आहे. देवांमध्ये भेद करणाऱ्या मानसिकतेला याच प्रेरणेचा छुपा तिरस्कार वाटतो.

 डीजे-चापट "आम्ही देवाला विरोध करत नाही, तर उत्सवातील अवडंबर आणि दिखाव्याला विरोध करतोय."

उत्तर: जेव्हा बहुजन समाज संघटित होतो आणि सार्वजनिक व्यासपीठावर एकत्र येतो, तेव्हाच विशिष्ट मानसिकतेला त्यात 'अवडंबर' दिसू लागते. हा विरोध अवडंबराला नसून बहुजन समाजाच्या संघटित विचारशक्तीला आणि प्रेरणेला आहे.

१६. गणेश मंडळे: सामाजिक सलोखा, ३६५ पैकी १० दिवस तरुण मुले एकत्र येऊन उत्सव व सामाजिक उपक्रम राबवतात.

 डीजे-चापट: "गणेश मंडळांचे कार्यकर्ते फक्त दादागिरी करतात, वर्गण्या वसूल करतात आणि लोकांची अडवणूक करतात." ते गावगुंड आहेत. 

उत्तर: गणेश मंडळांचे कार्यकर्ते दादागिरी करणारे नसतात. अडीअडचणीत वयोवृद्धांना मदत करणे, रुग्णवाहिकेला मार्ग देणे आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यात हीच तरुण मंडळी पुढे असतात. अलिप्ततेच्या नावाखाली बंद दारांत राहणाऱ्या संस्कृतीत म्हातारे लोक घरात मृत पावले तरी आठ दिवस शेजाऱ्याला खबर नसते! अशा वेळी समाजाला एकत्र बांधून ठेवणारे, एकमेकांची चौकशी करणारे आणि संकटकाळात धावून येणारे हेच तरुण कार्यकर्ते समाजाचे 'जिवंत रक्त' आहेत.

१७. रांगड्या पराक्रमाची अन् मर्दानी संस्कृतीची भूमी: मूळ मुद्दा: ही महाराष्ट्राची काळी माती रांगड्या, धडधाकट आणि मनगटात ताकद असणाऱ्या माणसांची भूमी आहे. इथे दहीहंडी, गणेशोत्सव, ढोल-ताशांचा गजर आणि दसऱ्याची सीमोल्लंघने हे केवळ साधे सण नाहीत, तर तो इथल्या शौर्याचा, धडाडीचा आणि मर्दानी परंपरेचा सोहळा आहे.

 डीजे-चापट "उत्सवांमध्ये इतकी शारीरिक शक्ती, गोंधळ आणि रांगडेपणा दाखवण्याची काय गरज आहे? ते सौम्य आणि शांत पद्धतीनेही साजरे करता येतात."

  उत्तर: महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शूरवीरांची भूमी आहे. इथली संस्कृतीच मुळात धडाडी आणि रांगड्या पराक्रमाची आहे. दहीहंडीचा मानवी मनोरा असो, दसऱ्याचे शौर्य असो वा ढोल-ताशांचा आवाज, हा इथल्या तरुण रक्ताचा मर्दानी बाणा आहे. ज्यांना या ताकदीचा विसर पडला आहे, तेच असे बोलू शकतात. 

1 comment:

  1. महेश कदम11 September 2026 at 09:34

    उत्सवांचा गजर हा केवळ आवाज नसतो; त्यामागे श्रद्धा, मेहनत, परंपरा आणि हजारो तरुणांचा उत्साह असतो. —ही बाजू अत्यंत प्रभावीपणे तुम्ही मांडली आहे 🙏

    ReplyDelete