ओशोंचे गणेश जन्मावरील भाष्य ऐकले त्यात त्यांनी हिंदू लोक भंपक काल्पना जसे की पार्वतीचा मळ, शंकर हिंस्त्र होणे , हत्तीचे शीर लावणे इत्यादी बद्दल बोलत आहेत व हिंदू लोक अजून प्राचीन आदिमानव जीवन जगत आहेत असा दावा केला. ते ज्ञानी आहेत पण पुराण कथांचा अन्वयार्थ लावताना बरेच गूढ विचारात घ्यावे लागते.
पूर्वी मी चातुर्मासात श्री विष्णू हे बारावे आदित्य आहेत म्हणजे आपले सूर्य आहेत व चातुर्मासात ते ढगाखाली गेलेले असतात (म्हणजेच समुद्रात निद्रिस्त आसतात) असा अन्वयार्थ लावला होता. तो इथेच ग्रुपवर आहे किंवा माझ्या वॉलवर मिळेल. असो .
गणपती जन्म कथा : पार्वतीचा मळ म्हणजे आदि स्त्रीचा रजोस्त्राव आहे . अगदी प्राचीन काळी मुले मैथुनातून जन्माला येतात याचे ज्ञान मानवाला आले नव्हते हे साहजिक आहे. त्यात मानवी गर्भधारणेचा काळ 9 महिने इतका मोठा आहे. हत्तीचा गर्भधारणेचा काळ हा १८ ते २२ महिने आहे. त्यामुळे आपले पूर्वज स्त्रीच पुरुषाशिवाय मूल जन्माला घालते असे मानणे अशक्य नाही . आज अनेक शोध लागल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होऊ लागला आहे.
विष्णूच्या कानातील मळातून मधू कैठभ राक्षस जन्मला आले असेही पुराणात आहे. थोडक्यात काय की पार्वतीला पुत्र झाला पण शिवाला तो अनेक कालावधीनंतर समोर दिसला त्यामुळे हा कोण नवीन अशी भावना होणे साहजिक आहे. त्यात शिव हे निरंतर ध्यान करणारे.
शिव जसे ध्यानात मग्न होते तसे त्यांचे गण हे पार्वतीच्या व त्यांच्या आजूबाजूला वावरत त्यांची काळजी घेत वास्तव्य करत होते. स्वतः पशुपती असल्याने हिंस्त्र जंगली प्राण्यांना माणसावळणे ही आद्य मानवाची कला आहे. ती शिवाला अवगत होती . इतकेच काय नंदी व सिंह, नाग व गरुड एके ठिकाणी वास्तव्य करणे अचंभीत करणारे आहे . याचे रहस्य शिव व पार्वती गणात दडले आहे. गण म्हणजे त्यात्या प्राण्यांना पाळणारे व काह्यात ठेऊन प्रेम करणारे मानव होत. हत्ती ह्या प्राण्याचे मानवी इतिहासात मोठे महत्त्व आहे . कवी भूषण शिवरायांच्या हत्ती दलाचे युद्धाला जाताना त्यांची शरीरे एकमेकांवर कशी आदळतात याचे रोचक वर्णन करतो . हत्ती हा बुद्धिमान आणि मानवाशी बुद्धीने मैत्री करून राहणारा प्राणि आहे . त्याला सांभाळणारे शिवाचे गण हे मानवच होते.
गणपतीची हत्या ?? गणपती शिवाचा मुलगा आहे हे शिवाला माहीत नसते तरी भगवती पार्वतीबरोबर असलेल्या गणांना नक्की माहीत होते . कारण हा गण प्राणी त्यांचे जनन यांचा अभ्यासक होता हे नक्की. शिवाने गणपतीची हत्या केली का ? की कठोर बोलणे टाकून बोलणे किंवा तुला संपवतोच असे म्हणणे म्हणजे हत्या ? महाभारतात एकदा भीमाने काही प्रण केला व त्यामुळे युधिष्टिराला मारावे लागणार होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला टाकून बोलायला सांगितले कारण असे करणे म्हणजे हत्या करणे होय , असे सांगितले.
आता शिव व गणेश यांच्याकडे यादृष्टीने पाहिले तर तिथे मोठा बाका प्रसंग उभा राहिला होता . त्यावर गणपती गणाचे लोक पार्वती व गणेशाच्या बाजूने उभे राहिले व त्यांनी शिवाला दाखला दिला की बाबा हा तुझाच पुत्र आहे .
हे हत्तीला मानणारे इतके ठाम होते की शिवाला माघार घ्यावी लागली . नंतर सगळे मंगळ झाले.
पण ह्या गणपती गणाचे आभार कसे मानावेत ? तर शिवपुत्र गणेश ह्या गणपती समूहाचा अधिपती झाला. त्यांचे जे टोटेम म्हणजे चिन्ह हे त्याने स्वतःच्या शिरावर लावले.
असे अनेक टोटेम आपल्या देशात होते. नाग , हत्ती , गरुड इतकेच काय बिष्णोई लोक आजही काळवीट देव मानतात.
मौसमी पाऊस यामुळे भारतात जंगले होती व मुबलक पशु होते तसे जगात कोठेही दिसत नाही. अमेरिकेत दक्षिण राज्यात 10 वर्षे दुष्काळ चालू आहे.
तिकडे कुमारिका मदर मेरीला पुत्र होतो यावर बखळ विश्वास आहे तोही 2200 वर्षांपूर्वी ! आपली पुराणे याहून कितीतरी जुनी पशु पक्षी मानव वनस्पती यांनी समृद्ध आहे.
गणेश हा हत्तीसम शांत विवेकी मानवाचा मित्र का आहे याचे हे मंथन.
पुढे आज कृष्णजन्म आहे . कृष्णहा स्वतः आदिमाता जगदंबेचा अवतार आहे हे दुर्गा सप्तशती अध्याय 11 मध्ये स्वतः देवीने सांगितले आहे . तसेच वाकसूक्त :ऋग्वेद 10.125 या आदिमायेच्या सूक्तात देवीने स्वतः मीच सर्वपरमेश्वरी आहे हे सांगितले तेच परत भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करताना सांगितले. हा योगायोग नव्हे .
गोकुळाष्टमीच्या सर्वाना शुभेच्छा.
ज्ञान देणारी देवी आहे व तिच्या अवतारात आलेले भगवंत श्रीकृष्ण आहेत .
विखुरलेले जोडले की सुंदर स्पष्ट चित्र तयार होते !! इतकेच
(सूचना – कोणता खंड/स्तंभ अनिवार्य आहे हे
समजून घेण्यासाठी किंवा कोणत्या स्तंभामध्ये काय
माहिती भरायची आहे हे समजून घेण्यासाठी
कृपया खालील तक्ता दोन बघावा )
No comments:
Post a Comment