मित्रांनो सांगण्यास आनंद होत आहे की मी युट्युबवर व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्याशी हितगुज करण्यास येत आहे माझे 3 व्हिडीओ प्रदर्शित झाले आहेत त्यांची लिंक इथे देत आहे , बऱ्याच अध्यात्मिक चर्चेसाठी अवश्य भेट द्या . लिंक अड्रेस बार मध्ये पेस्ट करावी
https://youtu.be/cPJqxj9XpcM?feature=shared
गणपती बाप्पा मोरया
जय शिवाजी जय भवानी
प्राण्यांचे आणि पक्षांचे मानवाशी अगदी उत्क्रांतीच्या काळापासून नाते आहे. मानव ज्याज्या बाबत शारीरिकदृष्ट्या कमी आहे त्यात्या बाबत त्याने आजूबाजूच्या प्राणी आणि पक्षांची मदत त्याचे प्रश्न सोडवण्यास घेतली आहे. ह्या सर्व प्राण्यांना मानवापेक्षा एक तिसरी शक्ती (third sense) अस्तित्वात असतो त्याचा उपयोग मानव आपली जी कमकुवत शक्ती आहे ती वाढवण्यास करीत असतो. याशिवाय पाळीव प्राणी-पक्षी व न पाळलेले प्राणी-पक्षी यांच्याकडूनही अनेक संदेश निसर्गतः मिळत असतात तेही काय आहेत हे समजून घेणे महत्वाचे आहे.
कुत्रा-अशुभ: कुत्रा दोन प्रकारचे संदेश लगेच देतो असा माझा वयक्तिक अनुभव आहे, त्यातील पहिला अनुभव मी भूकंपाचा घेतला होता १९९०-२००० च्या दशकात लातूर किल्लारीला भूकंप झाले तेव्हा पुण्यातही हादरे जाणवले. विशेष म्हणजे आम्ही पाळलेली स्टेफी ही जर्मन शेफर्ड कुत्री इवळत नव्हती पण बरीच अस्वस्थ दिसत होती. रात्रभर भूकून भूकून तिने बेजार केले होते. शेवटी मध्यरात्री ३.०० वाजता तो भूकंप झाला व त्यानंतर १ तासाने ती शांत झाली. दुसरा प्रकार वेगळा आहे, त्यात कुत्रे काहीतरी भयंकर संकट येणार हे समजून इवळयला लागतात. बाहेरील रस्त्यावरील कुत्री असे करीत असतील तर तुम्ही त्यांना हाकलून लाऊ शकता व ते दुसर्या जागी जाऊन तोच कार्यक्रम चालू ठेवतात. अशावेळी गल्लीतील कोणा एकाची वाईट बातमी हाती येते. तुमचे घरातील कुत्रे जर असे इवळत असेल तर घरातील कोणाला किवा जवळच्या नातेवाईकाला प्राणसंकट आहे असे धरून चालावे.
कावळ्याची जोडी -अशुभ: सहज दोन बसलेले कावळे आणि जोडी यात फरक आहे. जोडी म्हणजे कावळा आणि कावळी. जेव्हा ते घरटे बनवितात तेव्हा आसपास ते एकत्र असतात. ह्या स्थितीला कावळ्याची जोडी म्हंटले जाते.
अशी कावळ्याची जोडी एकदा दिसली असता तुम्ही आपल्या देवघरातील देवांचे दर्शन करून एक दीप प्रज्वलित करून त्रासापासून मुक्ती मिळवू शकता. पण रोजच जर दर्शन होऊ लागले तर पुढे एका वाईट घटनेची चाहूल ते देत आहेत हे समजून चालावे. अशावेळी तुमची जागा बदलणे, खिडकी बंद ठेवणे असे उपाय योग्य ठरते. तसेच जवळच्या नातेवाईक यांच्यापैकी कोणी वयोवृद्ध, आजारी असेल तर विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
टिटवी-अशुभ: टिटवी सहसा पाणथळ व निर्जन जागी अंडी व पिल्ले ठेवते. जेव्हा तिथे इतर पक्षी, मनसे किवा कुत्रे येतात तेव्हा ती मोठा कोलाहल करते. अशा कोलाहलात तुम्ही सापडला तर तिटवीचा अपशकून होतो. हा प्रत्येक माणसागणिक वेगवेगळा असू शकतो. एखाद्याला त्यानंतर पुढे लहान भांडणे होऊन मुक्ती मिळते किवा दुसरा मोठ्या अपघातात गारद होतो. यासाठी कुलदैवत दर्शन घेऊन द्वीप प्रज्वलित करून मनात आहे तो मंत्र म्हणून व्याप्ती कमी करता येते.
भारद्वाजपक्षी-शुभ: हा पक्षी मोठी झाडे, गवताळ प्रदेश अशा ठिकाणी वास्तव्य करतो. भारद्वाज पक्षी दिसला असता, काम यशस्वी होते. पैसे आणायला जाणार असताल तर पैसे लगेच मिळतात.एका मोठा इरिगेशन खात्यातील साहेब त्याच्या खुर्चीवर बसलेला असताना त्याला रोज भारद्वाज दिसायचा आणि त्याला रोज कोणीतरी पाकीट आणून द्यायचे तेव्हा ह्या शकुनाचे महत्व पटले. असो. मोर हा पक्षीही भारद्वाज सारखाच फळे देतो.
साळून्क्यांची जोडी: दिसली असता मुलाला अनेक मुली भेटतात, किवा मुलीला दिसल्यास अनेक मुले भेटतात. त्यांच्याशी चर्चा व मैत्री होते.
सवाष्ण स्त्री -शुभ: घरातून बाहेर पडून थोड्या अंतरावर सवाष्ण स्त्री दिसल्यास कार्यभाग सध्य होतो.
विधवा स्त्री -अशुभ: घरातून बाहेर पडून थोड्या अंतरावर किवा लगेच विधवा स्त्री दिसल्यास कार्यभाग सध्य होत नाही अडचणी येतात. उपाय वरीलप्रमाणेच.
घरात हिरव्या बांगड्या फुटणे हेही अशुभ आहे, उपाय वरीलप्रमाणे करावा.
ब्राम्हण बोडका व स्मश्रू केलेला आल्यास कार्यसिद्धी होत नाही.
उजवे व वरील नेत्र पुरुषाचे फडफडले तर तो शुभ योग समजला जातो व यश संपत्ती येते.
डावे व वरील नेत्र स्त्रीचे फडफडले तर तो शुभ योग समजला जातो व यश संपत्ती येते. या विपरीत घडल्यास ते अशुभ समजले जाते.
ज्यावेळी एखाद्या कामास बाहेर पडता तेव्हा दिवसा डाव्या नाकपुडीतून श्वास घेतला जात असेल तर ते शुभ होय. तेच रात्री कामास बाहेर पडताना उजव्या नाकपुडीतून श्वास घेतला जात असेल तर ते शुभ होय.
तर हे आहेत सामान्य शुभाशुभ शकून अपशकून. आता बरेच शकून अपशकून कालबाह्य झालेले आहेत. कारण ते प्राणी पक्षीच अस्तित्वात नाहीत.
यातील बरेच शकून अपशकून शेतकरी आणि कष्टकरी वर्गास लागू नाहीत. गृहस्थ, राजा, व्यवसायिक, ब्राम्हण यांना याचे फळ प्रकर्षाने जाणवते.
||शुभम भवतु||
No comments:
Post a Comment