हा मोठा कळीचा प्रश्न आहे. बऱ्याच पुरोहितांचे पोटपाणी देवळे, पूजा-अर्चा, होमहवन ह्यावर अवलंबून आहे त्यामुळे ह्या प्रश्नावर जोरदार चर्चा होत आलेली आहे. आपण ह्या प्रश्नाचा आज उहापोह करूयात.
मला विचारले तर देव प्राप्त करण्यासाठी पुरोहिताची गरज नाही. तुम्ही खऱ्या मनाने काहीही अर्पण केले तर ते देवापर्यंत पोचते, व तो संतुष्ट होतो. शबरीने उष्टी केलेली बोरे रामाला वाहिली व त्याने ती आवडीने खाल्ली हे उदाहरण तर आपण नेहमीच ऐकत आलो आहोत.
पण थांबा थांबा, थोडे थांबा. आता तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन असे उष्टे देवाला वाहायला गेलात तर लोक म्हणजे आपला समाज तुम्हाला वेड्यात काढेल. तरीही विचित्र नवस बोलणाऱ्या लोकांची कमी नाही. एकाने १०८ नारळाचे तोरण देवाला वाहायचा संकल्प केला. ते १०८ नारळाचे तोरण त्याने घरी बनवून नेले आणि त्या ऐन गर्दीत देवाला वाहिले तेव्हा खरेच नवस फेडणे किती अवघड असते हे त्या गृहस्थाला कळले. असो.
तर हे ईश्वर-देव प्राप्ती इतकी सोपी असताना हा पुरोहित वर्ग आला कुठून? शिवाय ह्या पुरोहितांचा मोठा रुबाब असतो. देवाचे नारळ, वाहिलेले साहित्य, साड्या, वस्त्रे इकडची तिकडे फिरवून तो फक्त पैसे मिळवत असतो. तेही विकलेल्या मालावर १०-२०% नफा असे नाही तर १००% त्याच्याच मालकीचे असते. हे कुणाही भक्ताला खरे तर अजिबात आवडत नाही. आत्ता कुठे लोक ह्या विषयावर मोकळेपणाने बोलू लागले आहेत. बर पुरोहीतही का गप्प बसावेत? ते म्हणतात कि लोक सिनेमाला हजार-दोन हजार असे खर्च करतात मग देवासाठी खर्च करताना का इतके ओरडतात?
तर हि पुरोहितशाही कशी जन्माला आली हे आपण आधी पाहूयात, मग सगळी उत्तरे आपोआप मिळतील. पुरोहित वर्ग आपल्याच काही चुका, निराशावाद आणि अज्ञानामुळे निर्माण झाला आहे असे मला वाटते. कसे ते पाहू.
१) प्रथांचे पालन: वर आपण शबरीचे उदाहरण पहिलेच. देवाच्या पूजेच्या काही प्रथा आहेत. त्यापेक्षा वेगळे काही केले कि लोक मूर्ख म्हणतात हेही आपण पहिले. प्रत्येक कुळाच्या काही प्रथा व कुलधर्म कुलाचार आहेत. ते माहित होणे याविषयी प्रत्येकाची जिज्ञासा असते. पण बऱ्याचदा घरातील कर्ते पुरुष काय स्त्रियासुद्धा चांगला व भरभराटीचा काळ असताना त्यांच्या कुलदैवताकडे ढुंकूनही बघत नाहीत. एकदा अडचणी सुरु झाल्या कि नाही नाही ते उपाय करतात. ग्रहांच्या दशेप्रमाणे हा काळ बदलत असतो. तो किती आणि कसा असतो ते पहा.
| ग्रह | महादशा वर्ष | |
| सूर्य | 6 वर्ष | |
| चन्द्र | 10 वर्ष | |
| मंगल | 07 वर्ष | |
| राहू | 18 वर्ष | |
| गुरु | 16 वर्ष | |
| शनि | 19 वर्ष | |
| बुध | 17 वर्ष | |
| केतु | 07 वर्ष | |
| शुक्र | 20 वर्ष |
ग्रहांच्या दशांचे दुष्परिणाम त्यांच्या कुंडलीतील स्थितीप्रमाणे मिळतात. दशेच्या ह्या तत्वाप्रमाणे प्रत्येक मानवाचे जेजे काही घडणार आहे ते नियत (म्हणजे नियतीप्रमाणे) घडत असते असे शास्त्र ह्यामागे आहे. वयक्तिकरित्या मी ते मान्य करत नाही कारण एकाच वेळी जन्माला आलेले दोन मानव एक चोर व एक सज्जन असे असतात. ते असे असतात कारण त्यांचे संस्कार तसे असतात. व त्याप्रमाणे त्यांची नियती बदलत असते. हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे म्हणून याविषयी नंतर आपण चर्चा करू. पण मूळ मुद्दा तोच राहतो, जो संस्काराप्रमाणे कुलधर्म कुलाचार करतो तो पुढे जातो. जो भक्ती करतो तो ह्या कठीण किवा चांगल्या वेळेत तारून जातो. जो चांगली वेळ आली म्हणून सगळे विसरून जातो, उततो, माततो आणि नंतर वाईट वेळ आली कि आणाभाका घेतो असे करोडो लोक आहेत, तेव्हा नेमके पुरोहित लोकांचे फावते.
२) जुन्या प्रथांचे संदर्भ:अनेक जुन्या प्रथा ज्यांची आज आपल्याला अजिबात गरज वाटत नाही त्या आज करायला लागतात. तळी कशी भरायची? बोडण (कुलदेवीला जाऊन आल्यानंतर ती आपल्याबरोबर येते व तिचा वास आपल्या घरी असतो. बहुतेक कुलदेवी ह्या भयंकर व उग्र आहेत त्यामुळे जर त्यांचे बोडण अथवा बोळवण केले नाही तर घरात भयंकर वाद, संकटे हि होतात. तेव्हा त्या देवीला परत पाठविण्यासाठी एक सवाष्ण व एक कुमारिका ह्यांना जेऊ घालून व सवाष्ण स्त्रीची ओटी भरून व कुमारिकेला वस्त्रे देवून बोळवण केली जाते) हे बोडण हा अतिशय सामान्य विधी आहे पण बऱ्याच महिला आर्थिक कारणांसाठी तो करीत नाहीत व नंतर नसते प्रश्न उपस्थित होतात. तसेच कुठले नवस कधी बोलावेत, भाग बांधणे म्हणजे काय? हेही बऱ्याच जणांना माहित नसते. नवसांचे विस्मरण हे आपले चौथीला पुजलेले प्रश्न आहेत.
काही स्त्रिया-पुरुष हे मला लाखाचे कंत्राट मिळू देत मी सव्वा किलो पेढे वाहील हा नवस बोलतात. किवा वंशाचा दिवा मिळू देत ११ नारळाचे तोरण वाहील असे बोलतात. अगदी हसू येते अशावेळी. म्हणजे तुम्ही लाखो कमावणार आणि देवाला फक्त सव्वाशे रुपयाचे पेढे वाहणार! वाह रे वाह. अति-आजारपणात, किवा लग्न जुळू देत, नोकरी टिकू देत, अगर मिळू देत म्हणून माउली सव्वा किलो पेढ्याचा नवस बोलते आणि नोकरी लागली कि पोरग तिला सव्वा रुपयाला महाग करून टाकत. ही आपली मातृपुजक संस्कृती.
आता भाग बांधणे म्हणजे काय? तर पूर्वी स्त्रिया बिचार्या संकट काळात मी संकट दूर झाल्यावर देवाला अमुक अमुक करील म्हणून एका कागदाच्या किवा कापडाच्या तुकड्यात सव्वा रुपया, सव्वा अकरा रुपये किवा घरातील अन्नधान्य बांधून ठेवीत असत, जेणेकरून ह्या नवसाचे विस्मरण होऊ नये हा यामागे उद्देश असे. नंतर जेव्हा कुलदैवत वरिला त्या जात तेव्हा हा नवस किवा संकल्प त्या पूर्ण करीत.
पण माणूस हा मोठा लबाड प्राणी आहे. जेव्हा तो संकटात असतो तेव्हा नाही नाही ते वचन द्यायला तयार होतो आणि संकट गेले कि मस्त होतो हे देवालाही माहित असते. म्हणूनच देवाने त्याचे नवस असे सव्वा किलो पेढ्याचे सोपे ठेवले नाहीत. "अग बाई वा बुवा तुला मुलगा मुलगी हवीये ना? मग ती सव्वा किलो पेढ्याने मिळत नाही." तिला देशकार्यासाठी सोड. समाजकार्यासाठी सोड, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सोड हि प्रांजळ मागणी आपली कुलदैवते करीत आली आहेत, आणि खरे आईवडील ते देत आले आहेत. त्या आईवडिलांनी असे त्यांचे लाडके लपवून ठेवले तर ते संसार करू शकत नाहीत किवा बंडाळी करून समाजसेवेत घुसतात किवा त्यांना त्यांच्या मनासारखे करू दिले नाही तर ते वाया जातात, हा अनुभव आहे. त्यामुळे कुलदैवताचा नाद ज्यांना त्याचे महत्व कळते त्यांनीच करावा अन्यथा त्याला विसर्जित करावे व आपल्याला जे जे वाटते ते देव घरात आणून टाळ कुटत बसावे.
एक गम्मत बघा: ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरानी आपल्या कुलदैवतेसमोर स्वातंत्र्याची शपथ घेतली त्याच कुलदैवतेच्या मूर्तीला त्यांच्या घरचे मंदिरात ठेऊन आले. कारण काय तर ह्या कुलदेवता ह्या उग्र असतात, व संसाराला आग लावतात. सावरकरांची कुलदेवी अष्टभुजा ही सध्या एका खंडोबा मंदिरात आहे असे ऐकण्यात आले. म्हणजे ज्या देवीने तुम्हाला परधर्म आक्रमणातून वाचवले तिला तुम्ही सोडले. असे हे आपल्या समाजातले स्थित्यंतर असते.
३) काशीयात्रा: हिंदू समाजात काशीयात्रा जन्माचे पूर्णत्व समजली जाते. काशीयात्रा करताना धनाची व जीवाची पर्वा करायची नसते. जन्मात हि यात्रा एकदातरी करावीच हा दंडक पूर्वी होता. जसे हज यात्रा तशीच हि आपली काशी! काशीला गेल्याचे फायदे काय? फायदे काहीच नाहीत तोटेच जास्त. एकतर तिथे लुबाडतात, शिवाय गलिच्छ अनुभव!
पण असे नाही, प्रत्यक्ष छत्रपती शिवाजींना त्यांची वंशावळ काशीला ज्ञात झाली असे म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीला आपण कोण आहोत, आपले वंशज कोण, आपली दैवते कुठली, हि शंका असते. तर अशाप्रकारे प्रत्येक कुटुंबातील एक एक व्यक्ती पूर्वी काशीला जाऊन येत असे. आपण तिथे गेल्याची नोंद तिथले पंडे करून ठेवीत असत. नाव, आडनाव, गोत्र, दैवत, कुलदैवत, कुलधर्म कुलाचार ह्यांचे ते पुरातन डाटा सेंटर होते. आणि तिथे जाऊन यायला पाहिजे हा दंडक होता, म्हणजे आपण कोण आहोत आपले कर्म काय याची आपोआप माहिती मिळायची व्यवस्था आपल्या धर्माने करून ठेवली होती. हीच माहिती आपले पूर्वज जर साक्षर आणि जुना इतिहास जपणारे असले असते तर त्यांनी त्यांचे सगळे लिहून ठेवले असते व काशीला जायची गरजच पडली नसती. आपली आडनावे त्यांचे वर्ग, प्रवर्ग, गोत्र ह्यातही मोठे गूढ दडलेले आहे. जे ब्राम्हण आणि मराठा जातीच्या लोकांचे आहे तेच मातंग समाजाचे नाव, आडनाव आहे. त्यामुळे देवाप्रती भेदभाव नाही.
४) मंत्र-तंत्र यातील क्लिष्टता: अमुक पूजा अशीच केली पाहिजे, अमुक शांती अशीच केली पाहिजे नाहीतर फळ मिळणार नाही असा एक समज आपल्या सर्वांत पसरलेला असतो. त्यावर उत्तर म्हणून शबरीचे उदाहरण तर आहेच, एखाद्याला अमुक नक्षत्र दोष आहे, एखाद्याला साडेसाती आहे किवा गुरुबळ नाही, एखाद्याला चुकलेल्या नवसाचा त्रास होतो आहे, कुणाचे बोडण राहिले आहे. असे असंख्य प्रश्न कुंडलीच्या अभ्यासाने किवा अनुभवाने समोर येतात. तेव्हा माणूस पुरोहिताकडे धाव घेतो, आणि खिसे मोकळे करून घेऊन आणखी एक संकट ओढवून घेतो. असे करायची खरेच गरज आहे का? तुम्ही ज्यांना मानता अशी पक्की १-२ दैवते तर बहुतेकांची असतात. त्या दैवतांशी संवाद साधायचा आपण प्रयत्न करतो का? तर करीत नाही. कारण देवांना मंत्राची भाषा कळते. आपली साधी भाषा कळत नाही असा आपला समज असतो. खरेच जो परमेश्वर कर्ता- नियंता आहे त्याला फक्त एक २००० वर्षापूर्वी जन्माला आलेली संस्कृत भाषाच कळते का? मग गणपतीची आरती मराठीत का? तर असे काही नाही. भाषा हे तुमची देवाप्रती व्यक्त करायच्या श्रद्धेचे एक माध्यम आहे. भाषा कुठलीही असू शकते. मग पुढचा प्रश्न मनात उभा राहतो कि देवाला नक्की काय म्हणायचे. त्यासाठी मात्र थोडे डोके चालवणे गरजेचे आहे. शरीर बलवान करण्यासाठी व स्वतःचे रक्षण करण्यासाठी अनेक मंत्र आहेत ते मंत्र अपुरा राहिलेला नवस पूर्ण करण्यासाठी म्हणून उपयोगी आहेत का? किवा एखाद्या नक्षत्राचा दोष, साडेसाती, गुरुबळ नाही अशी स्थिती असताना एखादे भावपूर्ण भजन म्हणून उपयोग आहे का? उत्तर नाहीच-नाही असे आहे. पुढे येते मंत्राची संख्या!
म्हणजे एकीकडे लोक लाखोंचा फायदा पदरात पाडून घेऊ इच्छितात आणि त्यासाठी एखादा मंत्र सहज पुट-पुटतात. मोठा गुन्हा करून एका मंत्राने त्याला क्षमस्व मिळावे हि अपेक्षा असते. तर थोडक्यात सांगायचे हेच कि केलेल्या कर्माचे किवा अज्ञानाचे इतक्या वेळा क्षमस्व मागायला हवे कि आपण ते परत करणार नाही हे चांगले लक्षात राहिले पाहिजे म्हणून मंत्र हजारो-लाखो अशा संख्येने म्हणावे लागतात. पण असे हजारो वेळा मंत्र म्हणायचे तर ते सूत्रबद्ध व तालबद्ध असतील तरच कमीत कमी चुका करता म्हणता येऊ शकतात. १५ व्या शतकात तुकोबांनी अनेक ओव्या रचल्या त्या अशाच प्रकारे! त्यांचेच पुढे मंत्र व अभंग झाले. आपण जर साधी साधी वाक्ये अशी सूत्रबद्धपणे तयार करून हजारो नाही पण किमान शंभर वेळा म्हणून शकलो तर तो आपल्या बोली भाषेतील एक मंत्रच बनून जातो. आता साधे उदाहरण पहा गुरूच्या मंत्राचे, "देवांच्या आणि ऋषींच्या गुरु असलेल्या बृहस्पती तुझे शरीर सोन्याने झळाळलेले आहे, तुला माझा नमस्कार असो. माझ्या राशीला असलेल्या तुझ्या प्रतिकूल स्थितीपासून तू माझे रक्षण कर, असे अगदी सध्या मराठीत आपण म्हटलो तर ते गुरूला ऐकू जाणार नाही का? कि गुरूला फक्त संस्कृतच समजते?

देवाधर्माचे गूढ म्हणजे यज्ञ करणे, शांती करणे, कर्मकांड ह्यामुळे पुरोहित वर्गाला पैसा मिळू लागला पण बहुजन समाजाने ह्या कर्मकांडाचे महत्व वाढू दिलेले नाही हेही तितकेच खरे आहे व कर्मकांडाचा मार्ग समाजाने फारसा स्वीकारला नाही. पण अजूनही बहुजन समाजाच्या कुलदेव-देवीच्या मंदिरातून पुरोहित वर्ग हद्दपार होत नाही हेही विचारात घेणे महत्वाचे आहे. आपले स्वतःचे प्रबोधन जोवर आपण करून घेऊ शकत नाही तोवर हा पुरोहित वर्ग आपल्याला लुटतच राहणार व त्याचे अस्तित्व टिकवून ठेवणार. गम्मत आहे ना.
No comments:
Post a Comment