Wednesday, 29 October 2025

नास्तिकांचे प्रश्न

खरेतर हा एक आगंतुक लेख आहे पण कृपया क्षमस्व, खाली दिलेले नास्तिकांचे प्रश्न आपण नेहमी ऐकतो.
देव आहे तर कुठे आहे ? 
नास्तिक देव मानत नाहीत तर त्यांना शिक्षा देणाराही कोणी नाही, त्यांनी खुलेआम चोरी, लुट, बलात्कार जे त्यांना योग्य वाटते ते बेछूट करावे. बघा २४ तासात तुम्हाला एका ४ बाय ४ च्या खोलीत ठेवतील, फारच अति केले तर गोळ्या घालतील. समाज हा देव असतो. पांचामुखी परमेश्वर ही म्हण विसरून चालत नाही. असामाजिक कृत्य हे प्रत्येक प्राणीमात्रात निषिद्ध समजले गेले आहे. सामाजिक कृत्य काय हे समजून घ्यायला भरपूर साधने आहेत, भारतात चिमण्या, कावळे, क्रौंच असे अनेक पक्षी आणि प्राणी हे सामाजिक जीवन काय असते ते सांगत असतात. नास्तिक हे लोक रामायणाची कल्पना क्रौंच पक्षापासून आली हे का मान्य करतील? क्रौंच पक्षी तर जगातून नामशेष व्हायचा मार्गावर आहे.
देव स्वत:हून एकदाही प्रकट का होत नाही ? 

देव किती वेळा प्रकट झालाय याची अगणित उदाहरणे आहेत. तो इतका वाकडा-तिकडा प्रकट होतो कि त्यावेळी जे हिशेब मांडणारे आहेत ते शेपट्या घालून गायब झालेले असतात. 
मुळात देवाने हे जग बनवण्याचं कारणच काय ? 
मग तुमच्या अस्तित्वाचे किवा न-अस्तित्वाचे करण काय? तुम्ही नास्तिक आहात ना
म्हणजे असं आहे का, की देवाच्या, मनात आलं, "जग बनवू " ?? ठीक आहे, पण का ? 
मनात सगळे तुमच्या येते, ज्याला मन असते त्याच्या मनात येते, ज्याला मन नाही त्या परमेश्वराच्या मनात येण्याचा प्रश्नच येत नाही. मुळात मन बुद्धी ह्या संकल्पना आस्तिक आहेत त्यामुळे मनात येणे हेच नास्तिकांच्या दृष्टीने चुकीचे आहे हे समजून नास्तिकांनी विचार करावा. कारण नास्तिकांच्या दृष्टीने मन असा प्रकार नसतो फक्त बुद्धी असते. बुद्धीचा वापर करा. 
का त्याला वाटलं असावं माणसाला जन्म द्यावा. मग त्यावर प्रतिवाद होतो, 'तो कलाकार आहे ' 
हूड!!! हे एकदम चुकीचे आहे, परमेश्वराने नुसते मानवाला जन्म दिलेला नाही, त्याने दगड धोंडे, पशु पक्षी, जलचर, उभयचर, सूक्ष्म कृमी कीटक ह्या सर्वांना जन्म दिलेला आहे. दगड धोंड्यांशीवाय कोणीही सजीव जगू शकत नाही. जीवनाचे क्षार दगड मातीतून मिळतात. 
 मग असं समजायचं का, की, 'आपण माणसं' , ही त्याने निर्माण केलेली कला आहोत.
मग तो खेळतोय का ? आपली मजा बघतोय का ?
उत्तर ?
कुणी म्हणतं, 'देवाच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही'. सगळा कर्ता-करविता तो आहे.
असं असतं तर आपण का म्हणून एखाद्याला गुन्हेगार म्हणून सजा करायची ? हा देवाच्या कलेचा अपमान नाही का ? तोच करत असेल ना हे ?
उत्तर ?
मेल्यानंतर स्वर्ग आणि नर्क मिळतो, यावर विश्वास ठेवणारे लोकं आपली व्यक्ती मेल्यावर रडतात का ? ती देवापाशी गेली म्हणजे सुखीच असेल ना ?
उत्तर ?
कुणी कुणाच्या धर्मावर काही बोललंच कि ती व्यक्ती चवताळून उठते. इतर धर्मावर सूड उगवते.
नक्की लोकांना कशाची भीती असते ?
उत्तर ?
'माझा धर्म नष्ट होईल' याची भीती असते का ?
का त्यामागे इतिहास कारणीभूत आहे ?
उत्तर ?
म्हणजे मुघलांनी हिंदूंना बरबाद केलं, मंदिरं तोडली अशा गोष्टी आपण वाचायच्या.
कदाचित मुस्लीमांच्यात हिंदूंनी त्यांना बरबाद केलं, मस्जीदी तोडल्या अशा गोष्टी असतील.
म्हणजे 'माझ्या धर्माचं अस्तित्व टिकणं' हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे … असं लोकांना वाटत असेल का ?
उत्तर ?
लोकांना एकदाही विचार करता येत नसेल का, की एवढे धर्म का आले ?
उत्तर ?
प्रत्येक धर्माचा वेगळा देव का आहे ?
उत्तर ?
मी हिंदू कथांवर, माझी आवृत्ती म्हणून लिहिली, अश्लील-आंबट असेलही कदाचित, पण त्या गोष्टीचा गाभा मी बदलेला नाही.
उत्तर ?
त्या गोष्टी पुराणात आहे तशाच घडतात.
कुणी म्हणतं, 'या गोष्टीतून शिकावं, म्हणून या रचण्यात आल्या'. पण काय शिकायचं ?
शंकर विष्णूने रूप घेतलेल्या मोहिनीच्या मागे लागतो, स्वत:ची बायको असताना. यातून काय घेण्यासारखं आहे ?
उत्तर ?
त्रिदेव, सतीला, एका स्त्रीला कपडे काढून जेवण वाढायला सांगतात, यातून काय घेण्यासारखं आहे ?
पार्वती मळाचा गणपती बनवते, हे पटण्यासारखं आहे का ? 
उत्तर ?
शंकराने डोकं उडवल्यावर ती तेच डोकं नाही का परत जोडू शकत ? काय घेण्यासारखं आहे यातून ?
इंद्र अहिल्येचा उपभोग घेतो, तिला फसवून. यातून काय घेण्यासारखं आहे ?
उत्तर ?
गणपती पडतो, म्हणून चंद्र हसतो, तर तो चंद्राला आपला अर्धा सुळा फेकून मारतो. काय घ्यायचं यातून ?
उत्तर ?
रावणाला मारायला राम कमी का पडतो ? का त्याला रावणाच्या भावाची साथ घ्यावी लागते ?
उत्तर ?
ब्रह्म -विष्णू - शंकर, हे सगळे महत्त्वाचे देव. यांनी सगळे इतर देव जन्माला घातले, निर्माण केले.
पण मग सगळे पुरुषच का ? एकही देवी नाही ? हे पटतंय का तुम्हाला ?
उत्तर ?
देव राक्षसांना शक्ति देतो, मग तोच त्यांच्याशी भांडतो. त्यांना संपवतो.
मग, 'देव पुढचा विचार करत नाहीत', हे मानायला वाव नाही  का ?
उत्तर ?
प्रत्येक पुराण हे वेगळी कथा का सांगते ?
उत्तर ?
कुणी तुमच्या देवांवर शिवीगाळ, अश्लील टिपणी केली, तर तुम्ही हत्यारं घेवून चवताळून उठता.
उत्तर ?
'तुमचा देव दुबळा आहे' हे सिद्ध नाही का होत यातून ? आपण दुबळ्याच्या रक्षणार्थ उतरतो ना, मग.
गणपतीची वर्गणी तुम्हाला घरोघरी जाऊन मागावी लागते, ही तुमची 'हार' नाही का ?
उत्तर ?
का म्हणून लोकं स्वत:हून येवून देत नाहीत ?
उत्तर ?
यातलं तुम्हाला काहीही पटणार नाही. तुमच्यापर्यंत हे पोहोचणारही नाही.
'देवाच्या अस्तित्वावर शंका निर्माण करू नये', असं ब्रेनवॉश केलं गेलंय तुमचं.
कुणीतरी तुमच्या विचारांना आत बंद करून, बाहेरून कुलूप लावलंय, त्याचा तुम्हाला त्रास होत नाही का ?
उत्तर ?
इतिहास पाहिला तर धर्मामुळे युद्ध पेटलेली पाहतो आपण. शहराच्या शहरं बेचिराख झालेली पाहतो आपण.
देवाला जराही वाटलं नसेल का, की 'माझ्या कलेची ही नासाडी होतेय म्हणून ?'
उत्तर ?
"माझ्या अस्तित्वावरच शंका घेणारा विचार मी माणसात निर्माणच का करावा", असं एकदाही वाटलं नसेल का त्याला ?
उत्तर ?
प्रश्न पडणं हे पाप नाही. प्रश्नांचं निरसन करणं ही आपली गरज झाली.
न्यूटनला प्रश्न नसताच पडला तर ?
एडिसनने आपल्या प्रश्नांचं निरसन केलंच नसतं तर ?
जर सगळ्यांनी, 'देव', एवढंच मानून चाललं असतं, तर हे शोध लागले असते का ?
मुळात त्यांना काही शोधायची प्रबळ इच्छाच झाली असती का ?
आपण पाठ्यपुस्तकात चंद्राला ग्रह मानतो, सूर्याला तारा मानतो. ते कसे निर्माण झाले हे शिकतो.
मग तरीही आपण चंद्र-सूर्याला का पुजतो ?
प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत, म्हणून आपण लगेच हार मानून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा का ?
उत्तर ?

No comments:

Post a Comment